स्नायू बळकट ठेवण्यासाठी काय काळजी घ्याल?


वय वाढत असतानाच स्नायू कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे स्नायू बळकट ठेवण्यासाठी व्यायाम करणे अत्यावश्यक आहे.वाढत्या वयासोबत शारीरिक क्षमताही घटायला लागते. 

मात्र, ही क्षमता कायम ठेवणे कठीण गोष्ट नाही. जाणून घेऊया तुम्हाला फायदेशीर ठरणार्‍या अशाच काही व्यायामांबाबत.

चिकाटी - चालणे, धावणे, पोहणे, सायकल चालवणे यासारख्या हृदयगती वाढवणार्‍या व्यायामामुळे शरीराची श्रम करण्याची क्षमता वाढते. 

सुरुवातीला हे व्यायाम प्रकार पाच मिनिटे करावेत. हळूहळू वेळ वाढवावा.

बळकटी - दुबळे स्नायू बळकट करण्यासाठी आणि मंद होत असलेली चयापचय क्षमता तीव्र करण्यासाठी हा व्यायाम खूप गरजेचा आहे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. तसेच यामुळे अशक्तपणाही येणार नाही आणि वजनही वाढणार नाही.

ताणणे - या व्यायामामुळे स्नायू व सांध्यांची हालचाल वाढते आणि तुम्ही सक्रिय राहू शकता. 10 ते 15 मिनिटे नियमितपणे स्नायू ताणण्याचा व्यायाम केल्यास तुम्हाला चालण्या-फिरण्यासही जास्त त्रास होणार नाही.

हातांसाठी हे करा - खुर्चीवर सरळ बसा आणि पाय जमिनीवर ठेवा. वजन पकडून हातांना सरळ ठेवा आता दोन्ही हातांना खांद्याच्या बरोबरीने आणा. एक मिनिट थांबा आणि हात पुन्हा खाली घेऊन या. असे 8 ते 15 वेळा करा.
What do you care about to keep your muscles strong?
थोडे नवीन जरा जुने