सेक्स न केल्यास काय होतं? हे तुम्हाला माहिती आहे काय….


वयात आल्यानंतर प्रत्येकालाच सेक्स संदर्भात एक आकर्षण असते. मात्र, लग्नानंतर काही काळाने नात्यामधील उत्साहसुद्धा कमी होऊ लागतो तसेच सेक्स लाइफवरही परिणाम पडतो. तुम्हाला सेक्स केल्याने काय फायदे होतात हे माहिती असेल पण सेक्स न केल्यास काय होतं? हे तुम्हाला माहिती आहे काय….
कामवासनेत कमी

कामवासनेच्या संदर्भात विवाद सुरु आहे. काही तज्ज्ञांना वाटते की सेक्स करत राहिल्याने कामवासना वाढते किंवा कायम राहते तर काहींना वाटते की कामवासना कमी होते.

व्हायरसपासून सुरक्षा

विल्क्स युनिव्हर्सिटीमधील संशोधकांना जाणवले आहे की, जे लोक आठवड्यातून एक किंवा दोन वेळा सेक्स करतात त्यांच्यामध्ये रोग प्रतिकारक क्षमता अधिक असते.

ताण-तणाव वाढतो

सेक्स केल्याने मानसिक आणि भावनात्मक ताण कमी होतो. तसेच सेक्स तुमच्यातील चिडचिडपणा कमी करतो. स्कॉटलंडमधील संशोधकांच्या म्हणण्यानुसार, ज्या लोकांच्या आयुष्यात सेक्स नाहीये ते लोकं दबावाच्या परिस्थितीत चांगलं काम करु शकत नाहीत.

पुरुषांवर परिणाम

अमेरिकी जरनल ऑफ मेडिसिन मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका वृत्तानुसार, जे पुरुष कमी सेक्स करतात किंवा सेक्स करतच नाहीत ते इरेक्टाइल डिस्फंक्शनचे बळी ठरतात.

हार्ट अटॅकचा धोका

सेक्स लाईफ चांगली असेल तर ह्रदयासंबंधी आजारापासून तुम्ही दुर राहाल. यासोबतच व्यायाम करण हासुद्धा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे सेक्स करत नसाल तर व्यायाम नक्की करा.

डोक्यावर परिणाम

सेक्स न केल्याचा प्रभाव मेंदूच्या क्षमतेवर पडत नाही असे अनेकांना वाटते. पण, सेक्स करत राहिल्यामुळे मेंदूत न्यूरॉन्सची नियमित वृद्धी होते.

थोडे नवीन जरा जुने