अबब आंबट संत्रीचे एवढे फायदे ?
- काळे मिरे (5) अद्रक 2 ग्रॅम, लिंबाचा रस (2 मिली) आणि चिमुटभर काळे मीठ एकत्र करून घ्या. कावीळ झालेल्या रुग्णाला दररोज हे मिश्रण दिवसातून दोन वेळेस दिल्यास आराम मिळेल.

- एक चिमुटभर हळद, एक चमचा दुधाची साय अर्धा चमचा लिंबाच्या रसामध्ये मिसळून शरीरावरील फोड, काळे डाग यावर लावल्यास आराम मिळेल.


- निर्गुंडीचे वाळलेले पानं (15) आणि ईडलिंबूचा रस (5 मिली) घेऊन चांगल्याप्रकारे एकजीव करून घ्या. मिरगीचा त्रास असणार्‍या रुग्णांच्या नाकामध्ये या मिश्रणाचे 3-4 थेंब दिवसातून 3 ते 4 वेळेस टाका. तीन ते चार महिने हा उपाय केल्यास वारंवार मिरगी येण्याचे प्रमाण कमी होईल.

- ईडलिंबूचा रस आणि एक कप लिंबाच्या रसामध्ये 1 ग्रॅम काळे मीठ टाकून पिल्यास किडनीच्या आजारामध्ये आराम मिळेल.

ईडलिंबू - लेमन (ईडलिंबू) या लिंबाचा आकार सामान्य लिंबाच्या आकारापेक्षा मोठा असतो. या फळाचा व्यास 2.5 ते 5 सेमी असतो.

निर्गुंडी (निरगुडी) - या झाडाची पाने कातरल्यासारखी असतात. साध्या निर्गुंडीस पांढर्‍या रंगाची बारीक फुले येतात. काळी निर्गुंडी म्हणूनही एक जात आहे. रानटी निर्गुंडीस वणई म्हणतात. ही औषधी वनस्पती आहे.


सावलीत वाळवलेल्या संत्र्याची साल बारीक कुटून शुद्ध तुपासोबत समान मात्रेमध्ये मिसळून घ्या. हे मिश्रण दिवसातून तीन वेळेस १-१ चमचा घेतल्यास मुळव्याध आजारात आराम मिळेल.


संत्र्यामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट्स असतात. हेस्पेरीडीन नावाच्या अँटिऑक्सिडंटमुळे रक्तवाहिन्या निरोगी राहतात आणि हृदयरोगांची शक्यता कमी होते. जे लोक दररोज 500 मिली संत्र्याचा रस सेवन करतात त्यांच्या शरीराला 292 मिली ग्रॅम हेस्पेरीडीन मिळते. हा रस उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासही मदत करतो.

संत्र्याचा रसामुळे किडनी स्टोन्स तयार होत नाहीत. संत्र्याचा रस ‘क’ जीवनसत्त्वाचा चांगला स्रोत आहे. कारण हे जीवनसत्त्व खास करून आंबट फळांमध्येच आढळते.
थोडे नवीन जरा जुने