दररोज तुळसीची पाने चावून खाल्ल्यास काय होईल ? तुम्हीच वाचा
हिंदू धर्मामध्ये तुळशीला पूजनीय मानले गेले आहे. तुळशीच्या झाडामध्ये अनेक औषधीय गुणधर्म असल्यामुळे आयुर्वेदातही तुळशीला खूप महत्व देण्यात आले आहे.


आज आम्ही तुम्हाला निरोगी शरीरासाठी तुळशीचे काही घरगुती उपाय सांगत आहोत


 दररोज तुळशीचे चार-पाच पानं खाल्यास सर्दी, ताप, खोकला या आजारांपासून बचाव होईल. दररोज तुळसीची पाने चावून खाल्ल्यास तोंडाचे आजार दूर होतात.


महिलांनी मासीक पाळीत पोट किंवा कंबरदुखीमध्ये एक चमचा तुळशीचा रस घ्यावा तसेच तुळशीचे चार-पाच पानं चावून-चावून खाल्यास आराम मिळेल.


तुळसीच्या मुळांचा काढा तापनाशक आहे. तुळस, अदरक वाटून मधासोबत घेतल्यास सर्दी आणि ताप या आजारात आराम मिळतो.


सकाळी पाण्यामध्ये तुळशीचे पानं टाकून ते पाणी पिल्यास संसर्गजन्य आजार होत नाहीत. डाग, खाज आणि त्वचेच्या आजारांत तुळसीच्या पानांचा अर्क त्या ठिकाणी लावल्यास काही दिवसात त्वचारोग दूर होतो.थोडे नवीन जरा जुने