जाणून घ्या, २ लवंग दररोज खाल्याने काय होईल?




आपल्या स्वयंपाक घरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्यासाठी आरोग्यमय ठरू शकतात. आरोग्यासोबतच सौंदर्य खुलवण्याचं कामही अनेक घरगुती वस्तू करतात. लवंग त्यातीलच एक आहे. आपलं आरोग्य सांभाळणं अनेक अंशी आपल्याच हातात असतं. 

आपण काही घरगुती उपाय केले तर आरोग्यासाठी फायदेशीरच ठरत असतात. लवंग अशी खाद्य वस्तू आहे ज्यामुळे आरोग्य उत्तम राखण्यास ती मदत करतेच शिवाय आपलं सौंदर्यही खुलवते. लवंगांचा वापर आपण मसाल्यात खूप वेळा केला असेल पण त्याचे अजूनही अनेक फायदे आहेत. ते आज आपण जाणून घेऊया...

लवंगमध्ये प्रोटीन, आयरन, कार्बोहाइड्रेट, कॅल्शियम, फॉस्फोरस, पोटॅशियम, सोडियम आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड युक्त असते. सर्दी-खोकल्यापासून तर अशा अनेक समस्या आहेत ज्यावर लवंगांचा वापर केला जातो.

पोटदुखीवर लाभदायक

गॅस, अपचन, ऍसिडिटी, कॉन्स्टिपेशन सारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी लवंग खूप उपयुक्त ठरते. सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यात लवंग तेलाचे काही थेंब टाकून ते पाणी प्यावे. यामुळे खूप आराम मिळे. जर आपण दररोज हा उपयोग केला तर वरील समस्या कायमस्वरूपी दूर होऊ शकतात.

चेहऱ्यावरील डाग दूर करणे

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यात लवंग खूप फायदेशीर आहे. यासाठी लवंगची पावडर बनवून कोणत्याही फेस पॅकमध्ये किंवा बेसन आणि मधामध्ये मिसळून हा पॅक चेहऱ्यावर लावावा. त्यानं चेहरा स्वच्छ व निर्जंतूक होतो. 
पण एक गोष्ट लक्षात ठेवा लवंगाची नुसती पावडर चेहऱ्याला लावू नका, ती खूप गरम होते. कोणत्याही फेसपॅकमध्ये मिसळूनच लवंग पावडरचा वापर करा.

केसांना चमकदार आणि सिल्की बनवते

ज्या लोकांना केसगळतीचा त्रास आहे आणि ज्यात केस कोरडे आहेत त्यांनी लवंगांपासून बनवलेल्या कंडीशनरचा वापर करावा. सोबतच लवंग थोड्या पाण्यात टाकून ते गरम करावे आणि त्या पाण्यानं केस धुवावेत. यामुळे केस काळे, मजबूत होतात. आपण लवंग तेल खोबरेल तेलात मिसळून त्यानं मालिशही करू शकतो.


तोंडाची दुर्गंधी दूर करते लवंग

आपल्या तोंडाला जर दुर्गंध येत असेल तर लवंग खाणं सुरू करा. जवळपास ४० ते ४५ दिवस दररोज सकाळी १-२ लवंग तोंडात ठेवाव्यात यानं दुर्गंधीची समस्येचा नायनाट होईल.


याशिवाय लवंगांचे काही खास उपयोग:

डोके दुखत असल्यास लवंगाचे तेल किंवा लवंगांचा लेप लावावा.

दात दुखत असल्यास किंवा हिरड्यांना सूज आल्यास लवंग तोंडात धरून चघळावी.

दमा, खोकला, आम्लपित्त यांवरही लवंगांचा उपयोग होतो.

सर्दी आणि खोकला यावर लवंगांचा काढा करून त्यात मध घालून द्यावा, कफ मोकळा होतो.

उलटी किंवा मळमळ होत असल्यास लवंग चघळल्यानेदेखील आराम पडतो.

सूज आल्यास त्यावर लवंगीचे तेल चोळून लावल्यानं आराम मिळतो.

अँटिबॅक्टेरिअल म्हणून लवंग काम करते.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मधुमेह झालेल्या रुग्णांसाठी लवंग अतिशय फायदेशीर ठरते.
थोडे नवीन जरा जुने