कोणते सफरचंद खाणे फायदेशीर आहे लाल कि हिरवे?चांगल्या आरोग्यासाठी दररोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. हे तर तुम्हाला माहीतच असेल. मात्र तुम्हाला माहीत आहे का लाल सफरचंद खाण्याच्या तुलनेत हिरवे सफरचंद खाल्ल्याने अनेक फायदे होतात. हिरवी सफरचंदेही लाल सफरचंदाप्रमाणेच गोड असतात. 

ही कमी खाल्ली जातात. मात्र याचे फायदे लाल सफरचंदाच्या तुलनेने अधिक असतात. हिरव्या रंगाचे सफरचंद लाल रंगाच्या सफरचंदापेक्षा थोडी महाग असतात. मात्र यात मोठ्या प्रमाणात लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि अनेक प्रकारचे अँटी ऑक्सिडंट्स लाल सफरचंदाच्या तुलनेत जास्त असतात. 

यामुळे रोगप्रतिकारक क्षमताही वाढते. पोषकतत्वांनी परिपूर्ण असलेले हे फळ भुकेशी संबंधित समस्या दूर करतात.

ज्या व्यक्तींना डायबिटीजचा त्रास आहे अशा व्यक्तींनी लाल सफरचंदे खाण्याऐवजी हिरव्या सफरचंदाचे सेवन करावे. यात साखरेचे प्रमाण कमी असते. दुसरी गोष्ट म्हणजे यात फायबर्सही जास्त असतात. यामुळे दीर्घकाळापर्यंत पोट भरलेले राहते. हे सफरचंद सालासकट खावे.

फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी चांगले हिरव्या रंगाच्या सफरचंदामध्ये फ्लॅवेनाईट असते हे तत्व अस्थमासारख्या आजारांमध्ये फायदेशीर अशते. हिरवे सफरचंद रोज खाल्ल्यास महिलांना होणाऱ्या फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याची शक्यता २१ टक्क्यांनी कमी होते.

हिरव्या सफरचंदामध्ये अँटी ऑक्सिडंट्स असतात. व्हिटामिन सी, ए आणि के असते. यामध्ये अँटी एजिंगचे गुण असतात. दररोज डाएटमध्ये सामील केल्यास तुम्ही तरुण आणि एनर्जेटिक रहाल.

हाडांसाठी फायदेशीर यातील व्हिटामिन के, कॅल्शियम आणि पोटॅशियम भरपूर असल्याने हे फळ महिलांसाठी फायदेशीर असते. रिसर्चुसार व्हिटामिन के महिलांना होणाऱ्या ऑस्टियोपोरोसिसपासून बचाव होतो.यामुळे हाडे मजबूत होतात. हिरव्या सफरचंदामुळे पाचनक्षमता सुधारते. 

तसेच शरीरातील टॉक्सिन बाहेर निघण्यास मदत होते. यातील फायबर सोप्या पद्धतीने पचले जातात. यामुळे चयापचय क्रियेचा वेगही वाढतो. तसेच वेगाने वजन कमी होण्यास मदत होते.
थोडे नवीन जरा जुने