मुली तुमच्यापासून का लांब पाळतात ? ही आहेत ५ कारणे

१) योग्य ड्रेसिंग सेन्स नसणे. बऱ्याच मंडळींना माहीत नसतं की कोणते कपडे कधी घालावे. फक्त झकपक दिसेल अस ते वागतात. आणि यामुळेच ते मागे राहतात. त्यामुळे कपडे खरेदी करताना एक वेळ विचार करावा हे नक्की आपल्या वर सूट होतात का? आणि मग च ते घ्यावे.


२) तोंडाचा वास येणे. मला सांगा एखादा व्यक्ती आहे जो तुमच्या शेजारी बसलाय आणि जोरजोरात बोलतोय. परत घाणेरडा वास येतोय त्याच्या तोंडाचा. तर तुम्हाला नक्की कस वाटेल? सहन कराल? अगदी तसच असत मुलींचं एक तर आजकालची पिढी सुद्धा नशेच्या आहारी गेलीये. खर्रा तंबाखू सिगारेट हे सगळं चालू असत आणि त्यात नीट स्वछताही पाळत नाही. आणि त्यामुळे तुमच्या प्रेमात पडणे तर दूर पण तुमच्या जवळही बसणार नाही. 


आणि कदाचित तुम्ही स्वतःहून बसले तर तिथुन उठून जाईल. त्यामुळे एक तर तुम्ही यावरती उपाय म्हणून २ वेळ ब्रश करत चला आणि दुर्गंधी जास्त असेल तर Mouth wash देखिल वापरू शकता.

३) नखे वाढलेली असणे व इतर शारीरिक स्वच्छता नसणे. आई सतत सांगत असते नखे किती वाढलित कधी काढणार ! नक्की आपण काय करतो. दुर्लक्ष करतो. याला काय होतंय अस म्हणतो. पण याचा समोरच्या व्यक्तीवर वाईट परिणाम होतो. तुम्ही कितीही सुंदर दिसा नको नको ती सौंदर्य प्रसाधनं वापरा परंतु जर नखेच स्वच्छ नसतील तर त्या सगळ्या ला काडीची ही किंमत नाही. यामुळे नखं केस दाढी या सगळ्या गोष्टी योग्य प्रकारे clean असाव्या.

४)बोलण्यात मृदुला असावी. शांतपणे अगदि हळू आवाजात बोलणारी मुलं सगळ्यांनाच आवडतात. आणि यावरच घरचे संस्कार ही दिसून पडतात. त्यामुके जास्त किर्कश पणे किंवा जास्त जोरात बोलू नये. कारण हे कोणालाच आवडत नाही. आणि मुली तर मुळात अगदी कोवळ्या मनाच्या असतात. त्या तरी बिचाऱ्या कस सहन करतील! त्यामुळे जास्त जोरात बोलू नये. आणि जास्त स्वतःतून मागे मागे ही करू नये. यामुळे तुमचं कॅरेक्टर खराब आहे अशी त्याच्या मनात एक भावना निर्माण होऊ शकते.

५) आत्मविश्वास कमी असणे. जवळपास ८० टक्के मूल ही मित्रांसोबत तर अगदी बिंदास राहतात पण समोर जर मुलगी असेल तर लाजतात. अर्थात हे स्वाभाविक असत. तर काही मंडळी एवढी बिनदास असतात की त्यांना किती ही मुली असो. काहीच वाटत नाही! जर तुम्ही ही या ८० टक्के लोकांमध्ये येता तर पुढील स्टेप्स फॉलो करा.


 आत्मविश्वास नक्कीच वाढेल. बोलताना नजरेस नजर मिळवून बोलावं म्हणजे एक मुलगी समोर आहे हे विसरून बोलावं म्हणजे याच तुम्हाला काहीही वाटणार नाही. थोडक्यात बोलावं नाहीतर बोलायचे काय तर बोलावं म्हणून नको. बोलताना चेहऱ्यावर एक हलकी स्माईल ठेवावी. यामुळे तुम्ही स्वभावाने चांगले आहात याची समोरील मुलीला खात्री पटेल. या सगळ्या गोष्टी आत्मसात करा तुमच्यासोबत कोणतीही मुलगी अगदी सहज मैत्री करेल.


थोडे नवीन जरा जुने