मधाचे 'हे' औषधी गुणधर्म तुम्हाला माहित असलेच पाहिजे !


त्वचारोग
सारखी अंगास खाज सुटते, गांधी उठतात, खरबरीत होते, त्वचेवर पांढरेपणा उत्पन्न होतो. त्वचेची आग होते. अशा वेळी मध रोज घेणे हितकारक आहे. रोज वयोमानाप्रमाणे १ ते २ तोळे मध व पाणी एकत्र करुन घ्यावे. अंगकाठी सतेज होते.

श्वास खोकला
श्वासामुळे सारखा लागणारा दम, कफामुळे सारखा येणारा खोकला, खोकुन खोकुन पोटात दुखु लागते. कंबर वाकते. एक प्रकारची तोंडावर सूज येते. अशावेळी मध अगर त्रिफळा पूर्ण व मध एकत्र करुन घावे.

कफ विकार
खोकल्याचा, दम्याचा त्रास ज्या व्यक्तीना होत असतो, त्यांनी मधाचा वापर आपल्या आहारात सतत करावा. त्यामुळे कफाचा जोर कमी होतो व अंगात उत्साह येतो. मध हा काही आजार असला, आपणास कोणत्यातरी गोष्टीपासून उपद्रव होत असला तरच घ्यावा, असे नाही. चांगल्या व्यक्तींनी सुध्दा मधाचा वापर करावा. कारण मध हा आयुष्यवर्धक व वीर्यवर्धक आहे. त्यामुळे आरोग्यसंपन्न होण्यासठी तो शरीरास उपयोगी आहे.
थोडे नवीन जरा जुने