Valentine Week-'तिला' प्रपोज करण्याआधी 'ह्या' काही गोष्टींकडे तुम्हाला ध्यान द्यावचं लागेल !


तुम्हाला एखादी मुलगी आवडत असेल... आणि आपल्या मनातील गोष्टी तिच्यापर्यंत पोहचवाव्यात असं तुम्हाला वाटणं गैर नाही... पण, मुलींना प्रपोज करताना आधी त्या मुलीची ओळख आपल्याला असणं गरजेचे आहे. तिच्या आवडी-निवडी जाणून घेणं गरजेचं असून, ती कधी आनंदात असते हे माहीत असणं आवश्यक आहे.

त्या मुलीच्या मनात तुमच्याबद्दल काय आहे हे तुम्हाला कळायला हवं, असं तुम्हाला वाटत असेल तर काही गोष्टींकडे तुम्हाला ध्यान द्यावचं लागेल. एखाद्या मुलीचा हे संबंध पुढे न्यायची इच्छा नसेल तर तिचा नकारही तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मुली जर या गोष्टी बोलत असतील तर समजून जा की ती मुलगी तुम्हाला कधीच होकार देणार नाही...

- 'मी या रिलेशनशिपसाठी सध्या तयार नाही' याचा अर्थ तुम्हीच समजा की ती तुमच्यासोबत संबंधांसाठी तयार नाही.

- 'मला वाटतंय की मी स्वत:वर आता जास्त लक्ष दयायला पाहिजे' तिचा अर्थ असा असतो की मी तुमच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये राहण्यापेक्षा एकटं राहणं पसंत करते.

- 'मी तुला त्या नजरेने पाहत नाही' म्हणजे ती तुमच्याकडे फक्त मित्राच्या नजरेने बघते.

- 'मी या आठवड्यात खूप व्यस्त आहे' याचा अर्थ तिला तुमच्याबरोबर फिरायला जायची इच्छा नाही.

- जर ती मुलगी तुमचा फोन उचलत नसेल किंवा मॅसेजचं उत्तर देत नसेल तर समजून जावं की ती तुम्हाला सांगतेय 'मला त्रास देण बंद कर'.

You need to pay attention to some of these things before she proposes
थोडे नवीन जरा जुने