'ह्या' पानांचे फायदे वाचून तुम्हीही व्हाल थक्क .. रोज आहारात करा समावेशपालक भाजीला जगातील निवडक आरोग्यदायी खाद्यपदार्थांच्या श्रेणीत स्थान मिळाले आहे. पालकाच्या पानांमध्ये आणि रंगात आरोग्याचे अनेक रहस्य दडलेले आहेत. पालकासोबत अनेक प्रयोग केले जाऊ शकतात. एव्हरग्रीन असलेल्या पालकाच्या भाजीत अनेक गुण आहेत. कोणत्याही पक्वान्नाची चव वाढवायची असेल तर पालकाचा अवश्य वापर केला पाहिजे.
फॉलेट
पालकाच्या भाजीत फॉलेट (फॉलिक अँसिडचा एक अंश) मोठय़ा प्रमाणात आढळून येतो. यामुळे हायपरटेंशन कमी होते आणि शरीराचा रक्तप्रवाहसुद्धा नियंत्रित राहतो.
आजारापासून बचाव :
फॉलेटसोबतच पालकाच्या भाजीत टोकोफेरोल आणि क्लोरोफिलीनदेखील आढळून येते. हे तिन्ही घटक मिळून गॉल ब्लॅडर कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, लिव्हर कॅन्सर आणि लंग कॅन्सरपासून बचाव करतात.


अँटिऑक्सिडंट्स
पालकामध्ये मोठय़ा प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आढळून येतात. यामुळे शरीराची ऑक्सिडेशनची प्रक्रिया नियंत्रित राहते.
आजारापासून बचाव :
पालकाच्या भाजीत असलेले अँटिऑक्सिडंट्स हृदयाच्या स्नायूंना मजबुती देतात आणि कार्डिओव्हेस्क्युलर आजारांशी लढा देतात. याशिवाय हे अँटिऑक्सिडंट्स हायपरलिपिडिमिया (रक्तात सर्वाधिक प्रमाणात फॅट किंवा लिपिड जमा होणे), हार्ट फेल आणि कोरोनरी हार्ट यासारख्या आजारांपासून व्यक्तीचे संरक्षण करतात.


ल्यूटिन
पालकाच्या भाजीमध्ये आढळून येणारा ल्यूटिन नावाचा पिवळा पिगमेंट पानांशिवाय अंड्याच्या बलकातही आढळून येतो.
आजारापासून बचाव :
ल्यूटिन अँथेरोस्क्लेरॉसिस नामक आजारापासून बचाव करतो. हा आजार आर्टलरीजमध्ये सर्वाधिक फॅट जमा झाल्यामुळे होतो. याशिवाय स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकासुद्धा पालकामुळे कमी होतो.


आणखीही आहेत फायदे
पालकात असलेले 'के' व्हिटॅमिन कॅल्शियमचे प्रमाण राखण्यास मदत करतो. यामुळे हाडे बळकट होतात आणि ऑस्टियोपोरोसिससारखे आजार दूर राहतात.
पालकामध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि फिटोन्यूट्रियंट्स असतात. यामुळे लहान मुलांची चांगली वाढ होते. त्यासाठी मुलांच्या जेवणात पालकाचा अवश्य समावेश केला पाहिजे.
पालक कच्चा न खाता शिजवून खावा. अर्धा कप शिजलेला पालक एक कप कच्च्या पालकाच्या तुलनेत तिप्पट जास्त पोषक द्रव्य देतो.


थोडे नवीन जरा जुने