'या' वनस्पती पासून मिळणारे फायदे पाहून आश्चर्यचकित व्हाल! ब्युटी इंडस्ट्रीमध्ये सुधा याचा वापर करण्यात येतो
कोरफडीच्या रसाचे अनेक फायदे आहेत. जे अनेक लोकांना माहिती नाही. ब्युटी इंडस्ट्रीमध्ये याचा वापर करण्यात येतो, त्यासोबतच आयुर्वेदात ही याचा वापर केला जातो. कोरफडीच्या रसाचा उपयोग तुम्ही अनेक समस्यांसाठी करू शकता.

कोरफडीचे झाड अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. ब्युटी इंडस्ट्रीमध्ये यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. मात्र कोरपड हे औषधी वनस्पती असल्याने सध्या लोक आजारांवर उपाय म्हणून याचा वापर करतात. कोरफडीचा उल्लेख आपण आयुर्वेदातही बघतो.

कोरफड फक्त एक झाड नसून त्वचेसंबंधी असलेले रोग दूर होण्यासाठी ही त्याची मदत होते. त्यासोबतच मधुमेह, लठ्ठपणा, अल्सर, बद्धकोष्ठता, जखम अशा आजारांवर उपायकारक आहे. चवीला कडवट असले तरी हेल्थ आणि सौदर्यांसाठी खूप फायदेशीर आहे.

पुरळ-मुरमा जाते

कोरफडीत एन्टीबॅक्टीरियल आणि अॅन्टी इंफ्लेमेटरी गुण असतात. त्यामुळे मुरामा होणाऱ्या बॅक्टिरियाला नष्ट करतात. त्यासाठी १ चमचा कोरफडीचा रस, २ थेंब लिंबाचा रस एकत्र करावा. ते मिश्रण चेहऱ्याला लावून मसाज करावा. हा लेप रात्री झोपताना चेहऱ्याला लावावा आणि सकाळी उठल्यावर चेहरा साबणाने धुवून टाकावा.

केसांच्या वाढीसाठी फायदेशीर

कोरफडी केसांना लावण्यासाठी २ चमचे कोरफडीच्या रसात १ चमचा एरंडेल मिक्स करा. हे मिश्रण केसांना लावून मालिश करावी. रात्रभर केसांना लावण्यानंतर सकाळी केस धुवावे.

वजन कमी करण्यास मदत

कोरफडीच्या रसात ७५ प्रकारचे एक्टिव विटामिन्स, मिनरल्स एंजाइम्स आणि फाइटोकेमिकल्स असतात. या सगळ्यांमुळे वजन कमी करण्यास मदत होते. वजन कमी करण्यासठी एक ग्लास पाण्यात कोरफडीचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करून प्यावे. तसेच चव बदलण्यासाठी त्यात मध ही टाकू शकता. हे नियमित प्यायल्यास वजन कमी होते.

पोटांच्या आजारातून मुक्ती

कोरफडीचा ज्यूस प्यायल्याने पोट नेहमी ठीक राहते. पचनक्रिया देखील नीट असते. कोरफडीच्या ज्यूसचे नियमित सेवन केल्यास बुद्धिकोष्ठता आणि अपचनापासून मुक्तता मिळते.

डायबिटीजवर कंट्रोल

१० ग्रॅम कोरफडीच्या रसात २ चमचे आवळ्याचा ज्यूस एकत्र करुन रोज सकाळी उपाशी पोटी प्यायल्यास डायबिटीज कंट्रोलमध्ये राहते.

थोडे नवीन जरा जुने