कांदा आणि लसणाचे हे फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित....


चीन : कांदा व लसूण आरोग्यासाठी विविध प्रकारे लाभदायक आहे. खाद्यपदार्थांची चव वाढवण्यासोबतच कांदा व लसूण वेगवेगळ्या गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठीही फायदेशीर ठरतात. कांदा व लसणाचा आता आणखी एक मोठा लाभ समोर आला आहे. 

तुम्ही आहारामध्ये कांद्याची पात, कांदा व लसणाचा समावेश करत असाल तर तुम्हाला कोलोरेक्टल कॅन्सर म्हणजेच मलाशयाचा कर्करोगाचा धोका कमी असतो. हल्लीच करण्यात आलेल्या एका अध्ययनातून हा दावा करण्यात आला आहे. कोलोरेक्टल कर्करोग हा मलाशय आणि गुदद्वाराचा कर्करोग आहे. 

मलाशय आणि गुदद्वार हे मोठ्या आतड्यांचा भाग आहेत. पचन तंत्राचा तो सर्वात खालचा भाग असतो. विविध प्रकारच्या कर्करोगामुळे लोकांचा मृत्यू होतो, त्यात महिला आणि पुरूषांच्या प्रकरणांमध्ये कर्करोगाचे हे अनुक्रमे दुसरे व तिसरे सर्वात मोठे रूप आहे. 

या अध्ययनात असे आढळून आले की, कांदा, लसूण आणि कांद्याची पात खाल्ल्याने प्रौढांमध्ये कोलरेक्टल कर्करोगाचा धोका ७९ टक्के कमी होतो. चायना मेडिकल यूनिव्हर्सिटीच्या फर्स्ट हॉस्पिटलचे झी ली यांनी सांगितले की, या अध्ययनातून जे निष्कर्ष समोर आले आहेत, त्यात काळजी घेण्यासाठी कांदा व लसणाचा समावेश असलेल्या भाज्या खाणे जास्त लाभदायक आहे.

You will be surprised to read about these benefits of onion and garlic
थोडे नवीन जरा जुने