तुमची जन्म तारीख सांगते तुमचे लव्ह मॅरेज होणार की नाही!

लव्ह मॅरेज झालं पाहिजे अशी जास्त लोकांची इच्छा असते. पण त्यासाठी मेहनतही घ्यावी लागते हे सर्वांनाच माहिती आहे. प्रेमात पडावं लागतं, ऎकमेकांना समजून घ्यावं लागतं, अनेक तडजोडी कराव्या लागतात, अशा अनेक गोष्टी आहेतच. त्यासोबतच असंही बोललं जातं की, जन्मतारखेवरूनही तुमचं लव्ह मॅरेज होणार की नाही हे कळतं. यावर काही लोकांचां विश्वासही आहे. पण यात किती खरंच तथ्य आहे याचा दावा आम्ही करत नाही….

मूलांक 1. 1, 10, 19, 28 ही जन्मतारीख असलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असते. ज्यांचा मूलांक 1 असतो त्यांचा स्वामी सूर्य असतो. 1 मूलांक असलेल्या व्यक्ती लाजाळू असतात. त्यामुळे अशा व्यक्ती प्रेम जाहीर करु शकत नाहीत. यामुळेच अशा व्यक्ती लव्ह मॅरेज करु शकत नाहीत.

मूलांक 2 – ज्यांची जन्मतारीख 2, 11, 20, 29 असते त्यांचा मूलांक 2 असतो. यांचा स्वामी चंद्र असतो. यांनी जर लव्ह मॅरेज करण्याचा निश्चय केला तर तो निश्चय त्या पूर्णत्वास नेतात.

मूलांक 3 – 3, 12, 21, 30 ही जन्मतारीख ज्यांची असते त्यांचा मूलांक 3 असतो. यांचा स्वामी गुरु असतो. लव्ह मॅरेज करण्यात या व्यक्ती यशस्वी होतात. तसेच यांचे वैवाहिक जीवनही सफल होते.

मूलांक 4 – ज्यांची जन्मतारीख 4,13, 22, 31 असते त्यांचा मूलांक 4 असतो. यांचा स्वामी राहू असतो. अशा व्यक्तींचे एकापेक्षा अधिक लोकांशी प्रेमसंबंध असू शकतात. जरी अशा व्यक्तींनी लव्हमॅरेज केले तरी त्याबाबत ते गंभीर नसतात.

मूलांक 5 – 5,14,23 ही ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचा मूलांक 5 आहे. यांचा स्वामी बुध आहे. या व्यक्तींची पारंपारिक विवाहरिती तसेच घरच्यांच्या संमतीनेच विवाह करण्यास पसंती देतात. अशा व्यक्तींचे विवाह सफल होतात.

मूलांक 6 – ज्यांची जन्मतारीख 6,15,24 आहे त्यांचा मूलांक 6 असतो. यांचा स्वामी शुक्र असतो. अशा व्यक्तींचे एकापेक्षा अधिक लोकांशी प्रेमसंबंध असू शकतात. त्यामुळे चांगल्या व्यक्तीला गमावतात.

मूलांक 7 – 7,16,25 ही जन्मतारीख असणाऱ्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. यांचा स्वामी केतु मानला जातो. यांना लव्ह मॅरेज करायचे असते मात्र ते त्यांच्या स्टेटसनुसार,

मूलांक 8 – ज्यांची जन्मतारीख 8,17, 26 असते त्यांचा मूलांक 8 असतो. यांचा राशी शनी असतो. अशा फार कमी व्यक्ती प्रेमसंबंध ठेवतात. मात्र एखाद्यावर प्रेम केले तर मरेपर्यंत कायम ठेवतात.

मूलांक 9 – ज्यांची जन्मतारीख 9,18, 27 आहे त्यांचा मूलांक 9 आहे. यांचा स्वामी मंगळ असतो. अशा व्यक्ती खूप घाबरणाऱ्या असतात. वादापासून दूर राहणे पसंत करतात. त्यामुळे अनेकदा इच्छा असूनही त्या लव्हमॅरेज करु शकत नाहीत.थोडे नवीन जरा जुने