म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने बांधकाम करताना ‘प्री-फेब’ या नाविन्यपूर्ण बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करावा - गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने बांधकाम करताना ‘प्री-फेब’ या नाविन्यपूर्ण बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करावा - गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडमुंबई :- सर्वसामान्यांना परवडणारी घरे निर्माण करताना महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने 'प्री-फेब' या नाविन्यपूर्ण बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज दिले.

‘प्री-फेब’ या नाविन्यपूर्ण बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंदर्भात मंत्री श्री. आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंदर्भात तंत्रज्ञांनी म्हाडामध्ये अधिकारी व विकासक यांच्यासमोर तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर सादरीकरण करावे. म्हाडाने या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पथदर्शी प्रकल्प राबवावा असे निर्देशही श्री.आव्हाड यांनी यावेळी दिले.

यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर व अन्य अधिकारी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने