मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक करणारी महिला पुढच्या जन्मी होईल कुत्री!


अहमदाबाद -मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक करणारी महिला पुढच्या जन्मी कुत्री होईल. अशा स्त्रीच्या हातचे जेवण करणारा माणूस पुढील जन्मी बैल होईल, अशी मुक्ताफळे स्वामी कृष्णस्वरूप दासजी महाराजांनी उधळली.
मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीला पुढचा जन्म कुत्रीचा येईल, असे वादग्रस्त वक्तव्य स्वामी कृष्णस्वरुप दासजी यांनी केले. भुज येथील स्वामी नारायण मंदिराचे ते स्वामी आहेत. एवढेच नाही तर मासिक पाळीच्या काळात जी स्त्री स्वयंपाक करते आणि ते अन्न जो पुरुष खातो त्याला पुढचा जन्म बैलाचा येईल, असेही वक्तव्य कृष्णस्वरूप दासजी यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.

'ज्या स्त्रीला मासिक पाळी आली आहे, तिने स्वयंपाक केला तर तिला पुढचा जन्म कुत्रीचा येईल. तिने केलेलं जेवण जो पुरुष जेवेल त्याला पुढचा जन्म बैलाचा येईल. अशा महिलांच्या हातचं तुम्ही खात असाल तर त्या गोष्टीला तुम्हीच जबाबदार आहात. शास्त्रात याबाबत अगदी स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. लग्न होण्याच्या आधीपासून तुम्हाला या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत.'' मी याआधी तुम्हाला अशा प्रकारचा कोणताही सल्ला दिलेला नाही. आपल्या धर्मातल्या काही गोष्टींबाबत बोलू नका..
थोडे नवीन जरा जुने