ठाण्यातील लेक सिटी मॉलला आग

ठाणे  :- ठाण्यातील लेक सिटी मॉलला आज दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. 


मॉलमधील चौथ्या मजल्यावर अडकलेल्या एकाला वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले. ठाणे पश्चिमेकडील कापुरबावडी परिसरातील लेक सिटी मॉलच्या पहिल्या मजल्यावर आज दुपारी आग लागली. या मॉलच्या चौथ्या मजल्यावर नामदेव झोरे हे अडकले होते. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
थोडे नवीन जरा जुने