गूळ स्वादिष्ट तर असतोच पण तब्येतीसाठी हि तेवढाच गुणकारीगूळ स्वादिष्ट तर असतोच पण तब्येतीसाठी हि तेवढाच गुणकारी असतो. गुळाला चांगल्या तब्येतीच्या खजाना म्हणलं जातं. डॉक्टरसूध्दा साखरे पासून दूर राहून गुळाचं सेवन करण्याचा सल्ला देतात. गुळाच्या सेवनाचे असे अनेक फायदे आहेत जे इतर कशातच नाहीयेत.

हिवाळ्यात नवीन गूळ बाजारात येतो म्हणून खूपजण याचं सेवन करायला सुरु करतात. पण खरंतर तूम्ही पूर्ण वर्षभर गूळ खाऊ शकता. गूळ खाण्याने खूप प्रकारचे आजार दूर होतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रत्येकाने गुळाला आपल्या आहाराचा एक भाग बनायला पाहिजे. पुढे जाणून घेऊ कि काय काय फायदे आहेत गूळ खाण्याचे…

आपल्यापैकी जे लोक कारखान्यामध्ये कामाला आहेत जिथे शक्यतो प्रदुषन जास्त असतं, त्यांनी दररोज 100 ग्राम गूळ खाण्याची आवश्यकता असते. जेवना सोबत किंवा जेवण झाल्यावर गूळ खाल्ला जाऊ शकतो. या सवयीमुळे प्रदूषणाने शरीरावर होणारा वाईट परिणाम आटोक्यात येतो.

जर तूम्हाला सांधे दुखीचा त्रास असेल तर गूळ आणि अद्रक खाणं तुमच्यासाठी उपायकारी राहील. गुळामध्ये कॅल्शियम आणि फॉसफरस मुबलक प्रमाणात असते. हे दोन्ही तत्व हाडांना मजबूती प्रदान करतात.

गूळ हा लोहाचा(iron) खूप चांगला स्रोत आहे. जर तुमचे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असेल तर दररोज गूळ खाण्याने तूम्हाला नक्की फायदा होईल. याच कारणामुळे डॉक्टर गर्भवती स्त्रियांना गूळ खाण्याचा सल्ला देतात.

जर तूम्हाला गॅसेस,बद्धकोष्ठता किंवा अपचन यांसारखे पोटाचे त्रास असतील तर गूळ खाण्याने तूम्हाला आराम मिळेल. जेवण झाल्यावर गूळ खाण्याने पचन शक्ती वाढते आणि सोबतच भूक पण वाढते.

थोडे नवीन जरा जुने