नाशिक-पुणे अवघ्या दाेन तासांवर


नाशिक : नाशिक आणि पुणे दरम्यान रेल्वे प्रशासनाने सेमी हायस्पीड रेल्वेला मंजुरी दिली असून या दोन शहारांतील अंतर यामुळे आता अवघ्या दोन तासांत कापता येणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे १६ हजार ३९ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.

 त्यापैकी ३ हजार २०८ कोटी रुपये राज्य आणि केंद्र सरकार एकत्रित खर्च करणार आहे. उर्वरित रक्कम राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांकडून घेतली जाणार आहे.

ब्रॉडवे दुहेरी मार्गासाठी २० बोगदे तयार करावे लागणार आहेत. या गाडीचा वेग प्रतितास २०० किलोमीटर राहणार असल्याने २३१ किलोमीटरचे अंतर हे अवघ्या दाेन तासांत पार करता येणार आहे.

हा मार्गावर दिवसभरात सहा रेल्वेगाड्या एकूण ४८ फेऱ्या मारतील. एका गाडीमध्ये एका वेळी ४५० प्रवासी प्रवास करू शकतील एवढी क्षमता राहणार आहे.
थोडे नवीन जरा जुने