महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना मंदी कळते का?उस्मानाबाद : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना मंदी कळते का? मंदी एका देशातून दुसऱ्या देशात जात नसते, जगभर मंदी असते, त्यामुळे थोरातांनी मंदी काय असते, हे समजून घ्यावे असा खोचक सल्ला पाटील यांनी दिला.

100 युनिट वीज माफी, नियमित कर्ज भरणाऱ्यांना 25 हजार अशा अनेक मुद्द्यांवर तिजोरीत पैसा नसल्याचे कारण सांगत समन्वय दिसत नाही. त्यामुळे हे सरकार लोकोपयोगी पडू दे, अशी प्रार्थना केल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.

 ‘कर्जमाफी फसवी ठरत असून नवीन घोषणा केली जात नाही. महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे, मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला स्थगिती दिली असून स्थगिती देणारे सरकार अशी यांची ख्याती होत चालल्याचा घणाघातही चंद्रकांत पाटलांनी केला.

A9 नावाचा बंगला मी वापरला, त्याला 5 वर्षात रंगही लावला नाही आणि खर्चही केला नाही. मात्र सध्याचे सरकार बंगले दुरुस्ती करताना भिंती पाडत आहेत.

 होत्याचे नव्हते केले. तुम्ही किती दिवस राहणार आहात? बंगले पूर्ण होण्याच्या आधीच तुम्ही जाणार आहेत. त्यासाठी किती खर्च करता? टेंडर न करता पैशाची उधळपट्टी सुरु आहे. कमी वेळेत जास्तीत जास्त ताटात ओढण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला.
थोडे नवीन जरा जुने