लघवी करताना होणारी जळजळ होते ? मग हे करा..शरीरात कुठलाही त्रास असेल तर तर लगेच उपचार करणे आवश्यक आहे. अनेकदा काही रोगांकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यापैकीच एक म्हणजे लघवी करताना जळजळ होणे.हा त्रास साधारण अनेकांना जाणवतो. परंतु अनेकजण याच्या उपयासंदर्भात अज्ञान असतात त्यामुळे याच्यावर योग्य उपाय करणे गरजेचे आहे. त्यामुळे एका खास उपायाने हा त्रास दूर करता येतो.


साहित्य -

ज्येष्ठमध - अर्धा चमचा

जिरेपूड - अर्धा चमचा

मध - एक चमचा

कृती -

एका बाऊलमध्ये ज्येष्ठमध व जिरेपूड घ्या. त्यात मध मिसळा.

रोज अर्धा चमचा हे मिश्रण घेतल्याने लघवी करताना जळजळ होणे थांबेल.
दरम्यान, त्रास जर जास्त असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घ्यावे.
थोडे नवीन जरा जुने