समाज प्रबोधनाचा वसा सोडणार नाही : इंदुरीकरपरभणी : मी तब्बल १७ ग्रंथाच्या आधारे ‘ते’ विधान केले आहे. अजूनही मी माझ्या विधानावर ठाम असून सोशल मीडियासह माध्यमांनी उठवलेल्या टीकेच्या झोडीमुळे काही काळ अस्वस्थ झालो. 

कीर्तन सोडून शेती करावी असा विचार आला होता. उद्विग्नता आली मात्र लोकांच्या चुका शोधणाऱ्या मीडियाला न जुमानता हाती घेतलेला समाज प्रबोधनाचा वसा कोणत्याही स्थितीत सोडणार नाही, असा निर्धार कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी उंडेगाव (ता.गंगाखेड) येथे व्यक्त केला.

मागील तीन दिवसांपासून इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याने राज्यभरात चर्चेला मोठे उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर उंडेगाव येथे महाशिवरात्री-निमित्त आयोजित सप्ताहात चौथ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी(दि.१४) रात्री त्यांच्या कीर्तनाविषयी मोठी उत्सुकता असल्याने तोबा गर्दी झाली होती. खा.संजय जाधव हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने