बिस्कीट आरोग्याला योग आहे का? हे आजार असणा-यानी बिस्किटांपासून दूरच राहावे


बिस्कीट हा पदार्थ लहान मुलांपासून मोठयांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे. मात्र हा पदार्थ आपल्या आरोग्याला योग आहे का? कारण नेहमी बिस्किटे खाल्ल्याने अ‍ॅसिडिटी, अपचन, दमा, मूळव्याध, मधुमेह, मलावष्टंभ, स्थूलता यांसारखे आजार होऊ शकतात. हे आजार असणा-यानी बिस्किटांपासून दूरच राहावे. अशा या बिस्किटांबाबत काही तथ्ये जाणून घेणे गरजेचे आहे.
बिस्कीट हा पदार्थ इंग्रजांबरोबर भारतात आला आणि भारतात चांगलाच रुजला. आजघडीला बिस्किटांचे मार्केट अडीचशे कोटी एवढे आहे. म्हणजेच एवढय़ा रकमेची बिस्किटे भारतीय दरवर्षी फस्त करतात.

आयर्वेदानुसार म्हणाल तर बिस्कीट हा ‘आरोग्यासाठी अपायकारक’ (vegetable oil) पदार्थ आहे. आयुर्वेदानुसार बिस्कीट हा ‘शिळा पदार्थ’ आहे. असा शिळा पदार्थ जो आपण पैसे देऊन विकत घेतो.

नेहमी बिस्किटे खाल्ल्याने अ‍ॅसिडिटी, अपचन, दमा, मूळव्याध, मधुमेह, मलावष्टंभ, स्थूलता यांसारखे आजार होऊ शकतात. हे आजार असणा-यानी बिस्किटांपासून दूरच राहावे. अशा या बिस्किटांबाबत काही तथ्ये जाणून घेणे गरजेचे आहे.

» दूध-बिस्कीट किंवा चहा-बिस्कीट हा नाश्त्याला पर्याय होऊ शकत नाही. मुलांना भूक लागलेली असताना पोहे, उपमा, शिरा, फळे असे पौष्टिक पदार्थ द्यावे. बिस्किटांवर भूक भागवू नये.

» बहुतांश बिस्किटे मैद्यापासून बनवलेली असतात. मैदा हा पचायला जड, पोटात चिटकून बसणारा, आरोग्याला अपायकारक पदार्थ आहे.

» बिस्किटातील प्रोटिन्स, मिनरल्स, इ. हा जाहिरातबाजीचा विषय आहे. (फेअर अ‍ॅण्ड लव्हली लाऊन कुणी खरंच गोरं झालं आहे का?)

» फायबरसाठी बिस्किटं खाणं वेडेपणा आहे. पालेभाज्या, फळे, गव्हाचा कोंडा, डाळींची टरफले, सलाड यातून आवश्यक फायबरची पूर्तता होते.

» जवळपास सर्वच बिस्किटांमध्ये डालडा तूप असते जे वाईट कोलेस्टेरॉल वाढण्यासाठी कारणीभूत ठरते. गाईचे तूप खायला सांगितल्यावर ‘कोलेस्टेरॉल वाढेल’ म्हणून आंबट चेहरा करणारे लोक चवीने बिस्किटे खाताना पाहून हसावं की रडावं तेच कळत नाही.

» डायबिटीससाठीची बिस्किटे हा निव्वळ गरसमज आहे. प्रत्येक प्रकारच्या बिस्किटांमध्ये (हो.. मारी बिस्किटामध्ये सुद्धा..!) साखर असतेच, ज्यामुळे रक्तातली साखर वाढते.

» ब्रेड, खारी, टोस्ट हे बेकरीचे पदार्थ बिस्किटाचेच भाऊबंद आहेत आणि बिस्किटासारखेच अपायकारक आहेत.

» सर्वात महत्त्वाचे म्हणजे बिस्कीट हा शिळा पदार्थ आहे. आयुर्वेदानुसार शिळे पदार्थ खाऊ नयेत.

» आमच्या एका बालदम्याच्या पेशंटला बिस्किटं बंद करायला सांगितल्यावर त्याच्या आईने आम्ही मैदा नसलेली गव्हाच्या पिठापासून बनवलेली बिस्किटेच त्याला देतो, असे अभिमानाने सांगितले. मग मी त्यांना विचारले, ‘तुम्ही पोळ्या बनवता का?’ त्यावर त्यांनी हो असं उत्तर दिलं.

» कशापासून बनवता? असं विचारल्यावर ‘अर्थातच गव्हाच्या पिठापासून’ असं उत्तर मिळालं. ‘मग दोन दिवसांची शिळी पोळी मुलाला देता का?’ असं विचारल्यावर त्यांनी ‘नाही’ असं म्हटलं. मग दोन महिने आधी बनवलेले बिस्कीट कसे चालेल? या प्रश्नाने त्या निरुत्तर झाल्या.

» बिस्कीट हा क्वचित/ एखाद्या वेळी/ चवीसाठी/ प्रवासात सोय म्हणून खाण्याचा पदार्थ आहे. तुमचा चहा बिस्किटांशिवाय पूर्ण होत नसेल तर ही आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे.
थोडे नवीन जरा जुने