निरोधक गोळ्या घेताय ? हे आहेत साईडेफ्कट


अनावश्यक गर्भझारणा रोखण्यासाठी महिला काय गर्भ निरोधक गोळ्या घेतात. मात्र या गोळ्यांचे अनेक साईडेफ्कट असतात. या गोळ्यांचा परिणाम महिलांवर होत असतो. अनेकदा या गोळ्या सुरूवातीला सेवन केल्यास त्याचा फायदा होता. मात्र नंतर या गोळ्यांचा उलटा परिणाम महिलेच्या शरिरावर होताना आपल्याला दिसत असतो. आणि नंतर या गोळ्या आपल्याला त्रासदायक वाटू लागतात.

शरिरात होणार्या हार्मोन्सच्या बदलांमुळे सततची डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास होता. तसेच शरिरातील एस्ट्रोजनचे प्रमाण कमी होते. आणि ज्याच्यामुळे डोकेदुखीचा त्रास अधिक होत असतो.

गर्भ निरोधक गोळ्यांचा त्रास कमी करण्यासाठी काही खास गोष्टी कराव्यात. जसे की, या गोळीमुळे उलटी सारखे वाटू शकते. त्यामुळे ही गोळी जेवणाच्या वेळी किंवा झोपताना घेऊ शकता. तसेच या गोळीला रोज एकाच वेळी घ्यावे. जेणे करून शरिराला देखील या गोळीची सवय होईल. आणि याचे साईड इफेक्ट कमी होतील.

गर्भ निरोधक गोळीमुळे महिलांना तीन महिन्यांच्या आत पीरियडमध्ये असामान्य ब्लिडींगला सामोर जावं लागतं. यावेळी डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे अत्यावश्यक आहे.

१) गर्भनिरोधक गोळ्या – उत्स्फूर्त परस्पर शरीरसंबंधांनंतर होऊ शकणारी गर्भधारणा टाळण्यासाठी स्त्रिया काही गर्भनिरोधक गोळ्या घेऊ शकतात. ज्या ४८ किंवा ७२ तासांच्या आत घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तयार होणाऱ्या हार्मोन्समुळे गर्भाची निर्मिती रोखली जाऊ शकते.

२) जन्म नियंत्रण गोळी – आजच्या काळात गर्भधारणा टाळण्यासाठी जन्म नियंत्रण गोळ्या घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे ,या गोळ्यांच्या नियमित सेवनाने अंडाशयातून होणारी बीज निर्मिती टाळण्यास वा पुढे ढकलण्यास मदत होते.

३) कॉपर टी – ‘कॉपर टी’चा उपयोग हा सर्रास वापरात असलेला एक उपाय . स्त्रियांच्या गर्भाशयात कॉपर टी नामक उपकरण बसवल्याने तयार होणाऱ्या हार्मोन्समुळे स्त्रियांच्या बीजाचे शुक्राणुशी मिलन होत नाही. परिणामी फलित अंड हे गर्भाशयाच्या आतल्या स्तराला चिटकत नाही. कॉपर टीच्या वापरामुळे पाच वर्षापर्यंत गर्भधारणा टाळता येते.

४) स्त्रियांसाठी कंडोम – पुरुषांप्रमाणेच स्त्रियांसाठीदेखील काही कंडोम बाजारात उपलब्ध आहेत. संभोग करण्यापूर्वी स्त्रीयांनी हे कंडोम योनीमार्गात घालावे , यामुळे पुरुष शुक्राणूंची स्त्री शरीरात जाण्यास प्रतिबंध होतो तसेच लैंगिक संबंधातून पसरणारे रोग टाळण्यास मदत होते.

५) गर्भधारणा-विरोधी लस – गर्भनिरोधक गोळीपेक्षा गर्भधारणा-विरोधी लस अधिक प्रभावशाली आहे. यामुळे स्त्रीबिजांचा नाश होऊन तीन महिन्यांपर्यंत गर्भधारणा टाळता येऊ शकते.

६) व्हजायनल रिंग- सौम्य प्लास्टिक पासून तयार केलेली व्हजायनल रिंग स्त्रीयांनी योनीमार्गात घालून ठेवल्याने २१ दिवसांपर्यंत गर्भधारणा टाळता येऊ शकते. व्हजायनल रिंगमुळे स्त्रीबिजांची निर्मिती रोखली जाते , स्त्रियांच्या बीजाचे शुक्राणुशी मिलन न झाल्याने फलित अंड हे गर्भाशयाच्या आतल्या स्तराला चिटकत नाही.

७) सायकलबीड्स (रंगीत मण्यांची माळ ) पद्धत – सायकलबीड्स ही ‘स्टँडर्ड डे’ मेथडवर आधारीत आहे. नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी ही अत्यंत प्रभावी पध्दत आहे. साधारणता २६ ते ३२ दिवसांनंतर मासिक पाळी येणाऱ्या स्त्रीयांसाठी ही पध्दत विकसीत करण्यात आली आहे.

कुटुंब नियोजनातील सायकलबीड्स (रंगीत मण्यांची माळ ) ) पद्धत हा एक अनोखा आणि किफायतशीर उपाय आहे. लाल चॉकलेटी व पांढरया अशा तीन रंगाच्या मण्यांची माळ तुम्ही मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे लाल रंगापासून मोजण्यास सुरवात करू शकता . तुम्ही जेव्हा पांढरया रंगावर असता तेव्हा गर्भधारणेची शक्यता अधिक असते तर चॉकलेटी रंगाच्या मणीवर कमी असते.

८) स्त्रीबीजवाहक नलिका बांधणे – स्त्रियांमध्ये प्रजोत्पादन कायमस्वरूपाचे थांबावण्यासाठी स्त्रीबीजवाहक नलिका शस्त्रक्रियेद्वारे बांधणे हा एक उपाय आहे. यामुळे फलित अंड वाढीसाठी गर्भाशयापर्यंत पोहचू शकत नाही.

९) नसबंदी – स्त्रीयांप्रमाणे पुरुषांमध्येही प्रजोत्पादनासाठी अक्षम करण्यासाठी पुरुषावर केली जाणारी शस्त्रक्रिया म्हणजे नसबंदी . .या शस्त्रक्रियेमध्ये शुक्रवाहीनीचे विच्छेदन केले जाते,त्यामुळे वीर्यनिर्मिती होत असली तरी त्यात शुक्राणू नसतात. या शस्त्रक्रियेमुळे नपुंसकत्व येत नाही आणि कामजीवनाचा आनंद पूर्वी सारखाच घेता येतो.
थोडे नवीन जरा जुने