मोबाईल हरवला आहे काळजी नको, असा शोधा...आज आम्ही तुम्हाला एका अशा ट्रिकबद्दल सांगणार आहोत की, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा हरवलेला फोन सहज शोधून काढू शकता. लवकरच अँड्रॉईड ‘फाईंड युअर फोन’ हे नवं फीचर देत आहे. हे फीचर आपल्या प्रत्येक हालचालींंवर नजर ठेवते आणि सर्व रेकॉर्ड आपल्याकडे सेव्ह ठेवते आणि गरज पडल्यास गुगल मॅपच्या मदतीने आपण आपल्या फोनचं लोकेशनही पाहू शकता.


या सोप्या स्टेप्स फॉल्लो करा
  • आपल्या स्मार्टफोन किंवा पीसीवर www.maps.google.co.in साईट ओपन करा.
  • यानंतर आपण हरवलेल्या स्मार्टफोनचं गुगल अकाऊंट यावर लॉग-ईन करा.
  • वरती उजव्या बाजूला कॉर्नरमध्ये दिलेल्या तीन लाईनवर क्लिक करा.
  • तिथे तुम्हाला ‘युअर टाइमलाईन’चा पर्याय दिसेल, ते सिलेक्ट करा.
  • ज्या डिव्हाईसचे लोकेशन तुम्हाला पाहायचे असेल त्याचे वर्ष, महिना आणि दिनांक एंटर करा.
  • यानंतर गुगल मॅप्स तुम्हाला तुमच्या डिव्हाईसची लोकेशन हिस्ट्री समोर ठेवेल.
  • एवढेच नाही तर हे फीचर तुम्हाला तमुच्या करंट लोकेशनची सुद्धा माहिती देईल.
  • जर तुम्हाला वाटतं हे फीचर तुमच्या डिव्हाईसवर व्यवस्थित काम करावं तर यासाठी तुम्हाला तुमच्या डिव्हाईसचे लोकेशन सर्व्हिस ऑन करावे लागेल.
थोडे नवीन जरा जुने