करोना व्हायरस : निरिक्षणाखाली असलेल्या २१ पैकी १९ जणांना घरी सोडले - आरोग्यमंत्री राजेश टोपे

करोना व्हायरस : निरिक्षणाखाली असलेल्या २१ पैकी १९ जणांना घरी सोडले - आरोग्यमंत्री राजेश टोपेमुंबई : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चीन आणि इतर बाधित भागातून आलेल्या मुंबई, पुणे, ठाणे यासह नांदेड, बुलढाणा, नागपूर, वर्धा, सांगली, अहमदनगर या जिल्ह्यातील प्रवाशांची वैद्यकीय विचारपूस करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. सध्या राज्यात पुणे आणि मिरज येथे प्रत्येकी एक जण रुग्णालयात निरिक्षणाखाली असून 19 जणांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे 12 हजार प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. राज्यात बाधित भागातून आतापर्यंत १०७ प्रवासी आले आहेत. त्यापैकी २१ जणांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयातील विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले होते. त्यापैकी २० जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले असून उरलेल्या एक जणाचा प्रयोगशाळा निकाल उद्यापर्यंत प्राप्त होईल. 21 पैकी 19 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे येथील नायडू रुग्णालयात १ आणि मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १ जण भरती आहे.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार वुहान शहरातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना भरती करण्याचे आणि त्यांचे प्रयोगशाळा निदान करण्याचे धोरण राज्यात राबविण्यात येत आहे. इतर बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांचा पाठपुरावा १४ दिवसांसाठी करण्यात येत आहे. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण १०७ प्रवाशांपैकी ३९ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवासी तपासणीचे काम वाढल्याने मुंबई विमानतळावर आरोग्य अधिकाऱ्यांच्या मदतीला कालपासून राज्य सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १० वैद्यकीय अधिकारी आणि १५ आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
००००

कोरोना वायरस: निरीक्षण में रखे गए २१ में से १९ लोग अस्पताल से रिहा
- स्वास्थ्य मंत्री राजेश टोपे

मुंबई:- कोरोना वायरस की पृष्ठभूमि पर चीन तथा अन्य प्रभावित संभागों से आने वाले मुंबई, पुणे, ठाणे, नांदेड, बुलढाणा, नागपुर, वर्धा, सांगली तथा अहमदनगर के यात्रियों की मेडिकल पूछताछ की जा रही है तथा अनुवर्ती कार्रवाई जारी है. मौजूदा स्थिति में राज्य के पुणे तथा मिरज शहरों में प्रत्यकी एक व्यक्ति अस्पताल में निरीक्षण के तहत भर्ती है तथा 19 अन्य लोगों को अब तक घर जाने के लिए अस्पताल से रिहा कर दिया गया है. यह जानकारी स्वास्थ्य मंत्री राजेश टोपे ने दी.

अब तक मुंबई अंतरराष्ट्रीय हवाई अड्डे पर लगभग 12 हजार यात्रियों की स्क्रीनिंग की गई है. बाधित संभागों से आने वाले यात्रियों का शोध क्षेत्रीय सर्वेक्षण के माध्यम से किया जा रहा है. राज्य में प्रभावित संभागों से अब तक 107 यात्री आ चुके हैं. इनमें से 21 लोगों को बुखार, सर्दी तथा खांसी के लक्षण दिखाई देने पर राज्य के विभिन्न अस्पतालों में ‘आइसोलेटेड कक्ष’ में भर्ती किया गया है. इनमें से 20 लोगों के नमूने प्रयोगशाला से प्राप्त हुए हैं, जो नेगेटिव पाए गए हैं. एक व्यक्ति की प्रयोगशाला रपट कल तक प्राप्त होने की संभावना है.

21 में से 19 लोगों को डिस्चार्ज दिया गया है. फिलवक्त, पुणे के नायडू अस्पताल में एक तथा मिरज के सरकारी मेडिकल महाविद्यालय में एक व्यक्ति भर्ती है. केंद्र सरकार के सूचना अनुसार वुहान शहर से आने वाले सभी यात्रियों को भर्ती कर उनके प्रयोगशाला निदान करने की नीति राज्य में चलाई जा रही है. अन्य बाधित संभागों से आने वाले यात्रियों की अनुवर्ती पूछताछ की जा रही है और यह 14 दिनों तक लगातार जारी रहेगी. बाधित संभागों से राज्य में अब तक 107 यात्रियों में से 39 यात्रियों की 14 दिनों तक अनुवर्ती पूछताछ पूरी की गई है. अंतरराष्ट्रीय यात्रियों की जांच का काम बढ़ने के कारण मुंबई हवाई अड्डे पर स्वास्थ्य अधिकारियों की मदद के लिए कल से राज्य के सार्वजनिक स्वास्थ्य विभाग की ओर से 10 मेडिकल अफसर तथा 15 स्वास्थ्य कर्मचारियों को नियुक्त किया गया है.
थोडे नवीन जरा जुने