गेच्या भूमिकेविषयी पुनर्विचार करण्यास सांगितले होते - आयुष्मान


अभिनेता आयुष्मान खुराना सध्या आपला आगामी चित्रपट शुभ मंगल ज्यादा सावधानच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करत आहे व त्याचे म्हणणे आहे की, हिंदी चित्रपट जगतातील अनेक लोकांनी पडद्यावर गे(समलैंगिक पुरुष)ची व्यक्तिरेखा साकारण्याच्या त्याच्या निर्णयावर त्याला पुन्हा विचार करण्यास सांगितले होते. 

आयुष्मान म्हणाला की, मी जे काही आहे आपल्या कुटुंबामुळे आहे. ते नेहमी मला समर्थन देत आले आहेत व त्यांच्यामुळेच मी आयुष्यात महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकलो आहे. जेव्हा मी अभिनयात येण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ते माझ्यापाठी एका डोंगराप्रमाणे उभे राहिले.

आयुष्मान पुढे म्हणाला की, माझे चित्रपट समाजातील रूढीवादी विचार तोडणाऱ्या विषयांवर आधारित असतील, असा जेव्हा मी निर्णय घेतला, तेव्हा त्यावरदेखील त्यांनी मला समर्थन दिले व लोक काय म्हणतील याविषयी कधीही विचार न करण्याचा सल्ला दिला, मात्र इंडस्ट्रीतील अनेक लोकांनी पडद्यावर समलैंगिक व्यक्तीची भूमिका साकारण्याच्या माझ्या निर्णयावर मला विचार करण्यासही सांगितले होते. 

शुभ मंगल ज्यादा सावधान माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वपूर्ण निर्णयांपैकी एक आहे. इंडस्ट्रीतील अनेक लोकांनी मला त्यावर पुनर्विचार करण्यास सांगितले. कारण कोणत्याही मुख्य हीरोने पडद्यावर कधीही समलैंगिक व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारलेली नाही, परंतु मला ठाऊक होते की, हा विचार बदलण्याची गरज आहे व हीच योग्य वेळ आहे..
थोडे नवीन जरा जुने