नवरा बायकोची प्रत्येक गोष्ट का ऐकतो ?

एखाद्या पुरुषाकडून काही काम करवून घ्यायचे असेल तर त्याच्या पत्नीमार्फत ते नक्की पूर्ण होईल असे मानले जाते. स्त्री मन जाणणे फार कठीण आहे असे म्हटले जाते. आपला हट्ट पुरवण्यासाठी ती वेगवेगळ्या युक्त्या वापरते. या सगळ्या कारस्थानात नवरा मात्र उगीच अडकतो.

एखादे काम करण्याची स्त्रीची इच्छा नसेल तर ती भोळा-भाबडा चेहरा करून बसून जाते. तिच्या चेहऱ्यावर केविलवाणेपणा, अगतिकता दिसायला लागते. काही चूक झाल्यास स्त्रिया लहानसा चेहरा करून बसून जातात. बायकोला अशा रडवेल्या अवस्थेत पाहून कोणताही नवरा तिची मनधरणी केल्याशिवाय राहणार नाही.

सगळे काम पूर्णपणे माहित असूनही अनेकदा स्त्रिया आपण अजाण असल्याचे दाखवतात. प्रत्येक गोष्ट नवऱ्याला करायला सांगतात. स्त्रियांचे हे अजाणपण पुरुषांना खरे वाटते.नवऱ्याला लाडीगोडीने समजावण्याचे कौशल्य स्त्रियांना उत्तमरित्या अवगत असते. नवऱ्याला काय आवडते व काय नाही, हे त्यांना चांगलेच माहित असते. एखाद्या विशेष प्रसंगी गिफ्ट देऊन महिनाभर आपले काम त्या काढून घेतात.

स्त्रियांकडे असलेले सर्वात मोठे हत्यार म्हणजे अश्रू. याला सगळेच पुरुष घाबरतात. स्त्रिया याचा पुरेपूर फायदा उचलून आपल्या मनातील गोष्टी साध्य करून घेतात.
थोडे नवीन जरा जुने