भंडारा व गोंदिया जिल्ह्यांमध्ये इको-टुरिझम डेस्टीनेशन पॉईंटस विकसित करणेबाबत आढावा बैठक
मुंबई : नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती तसेच वन्य प्राण्यांचे संवर्धन व संरक्षण इको-टुरिझम मार्फत करणे याबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक विधानभवन येथे झाली.

वनांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे, त्यात इको-टुरिझमच्या अनेक संधी दडलेल्या आहेत. निवासव्यवस्था, वाहतूक व्यवस्था, जंगल-सफारी, कन्झर्व्हेशन पार्क मोठ्या प्रमाणात निर्माण केले गेल्यास पर्यटक या भागाकडे आकृष्ट होतील, तसेच स्थानिकांना रोजगारही मिळेल. प्राथमिक आराखडा तयार करताना या बाबी प्रकर्षाने विचारात घेण्यात याव्यात आणि हा आराखडा सादर करावा, असे श्री.पटोले यांनी सांगितले.

तसेच भंडारा व गोंदिया जिल्ह्यांमध्ये इको-टुरिझमच्या संधी असून या संदर्भात संबंधित विभागाने एक महिन्याच्या आत प्राथमिक आराखडा तयार करावा.

शालीमार इंटरनॅशनलचे संचालक आदित्य धनवटे यांनी बैठकीत सादरीकरण केले. बैठकीस ऊर्जा विभागाचे सचिव असिम गुप्ता, वन विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमटीडीसीचे संचालक अभिमन्यु काळे, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक श्री.रामानुज आणि भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने