निर्यात सलग ६ व्या महिन्यात घसरून जानेवारीत १.६६ %नवी दिल्ली :पेट्राेलियम, प्लास्टिक, कार्पेट, हिरे व दागिने तसेच चर्म उत्पादनांची निर्यात कमी झाल्यामुळे देशाची निर्यात जानेवारीमध्ये १.६६ टक्क्यांनी घसरून २५.९७ अब्ज डाॅलरवर आली आहे. आयातही सलग आठव्या महिन्यात ०.७५ टक्क्यांनी घसरून ती जानेवारीत ४.१४ अब्ज डाॅलरची झाली. 

परिणामी व्यापार तूट विस्तारून ती १५.१७ अब्ज डाॅलर अशा सात महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर आली असल्याचे सरकारी आकडेवारीमध्ये म्हटले आहे.

साेन्याची आयात देखील ९ टक्क्यांनी घसरून ती आढावा काळात १.५८ अब्ज डाॅलरची झाली. गेल्या वर्षाच्या जानेवारी महिन्यात व्यापार तूट फुगून १५.२८ अब्ज डाॅलर झाली आहे.

देशाची निर्यात या वर्षात काहीशी थंडावलेली हाेती. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अाैद्याेगिक उत्पादनात ०.३ टक्क्यांनी घसरण झाली हाेती. दरम्यान, जानेवारी महिन्यात तेल आयात १५.२७ टक्क्यांनी वाढून १२.९७ अब्ज डाॅलरवर तर बिगर तेल आयात ६.७२ टक्क्यांनी घसरून २८.१७ अब्ज डाॅलरवर आली. एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या काळात निर्यात १.९३ टक्क्यांनी घसरून २५६. २६ अब्ज डाॅलरवर तर आयात ८.१२ टक्क्यांनी घसरून ३९८.५३ अब्ज डाॅलरवर आली आहे. देशाच्या निर्यात कामगिरीवर उद्याेग क्षेत्रातील विविध तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

३० प्रमुख क्षेत्रांपैकी १८ क्षेत्रांमध्ये नकारात्मक वाढ : देशातल्या ३० प्रमुख क्षेत्रांपैकी जवळपास १८ क्षेत्रांनी जानेवारीमध्ये निर्यातीत नकारात्मक वाढीची नाेंद केली आहे. यामध्ये प्लास्टिक, कार्पेट, हिरे आणि दागिने व चर्म उत्पादनांनी अनुक्रमे ७.४२ टक्के, १०.६२ टक्के, ५.१९ टक्के, ६.८९ टक्के आणि ७.५७ टक्के अशी नकारात्मक वाढ नाेंदवली आहे.
थोडे नवीन जरा जुने