भरदिवसा महिलेला पतीने पेट्रोल टाकून पेटवले


लासलगाव : हिंगणघाट येथील फुलराणीला पेट्रोल टाकून जाळल्याची घटना उलटून आठवडा हाेत नाही तोच नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बस आगारात एका तीस वर्षीय महिलेला भरदिवसा तिच्याच दुसऱ्या कथित पतीने पेट्रोल टाकून जाळल्याची तक्रार पीडित महिलने दिली असून या घटनेने राज्याला पुन्हा सुन्न केले आहे.

 संबंधित महिला ६७ टक्के भाजली असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याने लासलगाव ग्रामीण रुग्णालयातून उपचारासाठी तिला नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
थोडे नवीन जरा जुने