भरधाव कारच्या धडकेत एक जण ठार


पुणे : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील एक ठार झाल्याची घटना लोहगाव येथे घडली. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वासुदेव मदनलाल व्यास (४५, रा. वडगाव शेरी, पुणे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी गणेश व्यास (१९, रा. वडगाव शेरी, पुणे) याने फिर्याद दिली आहे.

 फिर्यादी व त्याची आई ज्योती व्यास, वडील वासुदेव व्यास हे लोहगाव येथून साखरपुड्याच्या स्वयंपाकाचे काम संपवून दुचाकीवरून वडगाव शेरी येथे जात होते.
थोडे नवीन जरा जुने