रोज सकाळी दोन चमचे हळद टाकून दूध पिल्याने काय होईल ?
वरचेवर सर्दी होण्याच्या समस्येवर ‘हळदीचे दूध’ हा एक रामबाण उपाय आहे. दूध आणि हळदीमध्ये औषधी गुण असल्याने ते शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी आहे. हळदीतील जंतूनाशक गुणधर्मामुळे प्राचीन काळापासून त्याचा औषधांमध्ये वापर केला जातो. त्यामुळे आजारांपासून दूर राहण्यासाठी चेकमेट टाईम्सच्या विशेष वृतात जाणून घेऊयात हळद टाकून दुध पिण्याचे फायदे. एका संशोधनानुसार हळदीमध्ये उपस्थित तत्व कँन्सर कोशिकांमुळे डीएनएला होणारे नुकसान रोखतात आणि केमोथेरेपीच्या परिणामांना कमी करतात.

सर्दी-खोकला झाल्‍यास दूधात हळद घालून पिण्‍यास सांगितले जाते. अद्रक आणि एक चमचा हळदीच्या रसात मध मिसळून पिल्याने सर्दी-खोकला बरा होण्यास मदत मिळते.

हळदीमध्ये जंतूनाशक गुणधर्म असल्याने घश्यातील खवखव कमी करते तसेच दुधामुळे श्वसनमार्गातील अडथळे दूर होण्यास मदत होते.

हळदीच्या दुधामध्ये ‘अ‍ॅन्टी ऑक्सिडंट’ गुणधर्म अधिक असल्याने डोकेदुखी व अंगदुखीची समस्या कमी होण्यास मदत होते.

हळदीच्या दुधामुळे लिव्हर मजबूत होते. लिव्हरशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठी हळदीचे दुध उत्तम उपाय आहे.
हळदीच्या दूधामध्ये अ‍ॅन्टीवायरल गुणधर्म असल्याने शरीरातील जंतूंचा प्रादुर्भाव वाढण्यास प्रतिबंध होतो. तसेच शरीरातीची रोगप्रतिकारशक्ती सुधारल्याने यकृतावर होणारा जंतूंचा आघात कमी होतो.

झोपण्यापूर्वी तासभर आधी ग्लासभर गरम दूध प्यायल्यास शांत झोप मिळण्यास मदत होते. दुधातील सेरोटोनीन व मेलॅटोनीन ताण कमी करून शांत झोप मिळण्यास मदत करतात.

हळदीचे दूध प्यायल्याने शरीरातील सांधे बळकट होतात. तसेच वेदना कमी झाल्याने सांधेदुखीच्या रुग्णांच्या शरीरातील स्नायूंची लवचिकता वाढते.

आयुर्वेदानुसार हळदीचे दूध प्यायल्यास रक्ताचे शुद्धीकरण होते. शरीरातील रक्तभिसरणाची प्रक्रिया सुधारते तसेच हळदीतील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटकामुळे विषारी घटक बाहेर पडण्याची प्रक्रिया सुधारते.
थोडे नवीन जरा जुने