अहमदनगर मध्ये हिंगणघाटची पुनरावृत्ती!


नेवासे : हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला एकतर्फी प्रेमातून पेटवल्याची घटना ताजी असतानाच, नेवासे तालुक्‍यातील मोरेचिंचोरा येथे विवाहितेच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवल्या चा धक्कादायक  प्रकार समोर आला आहे . यामध्ये विवाहिता गंभीर भाजली आहे.

या घटनेत गंभीर जखमीवर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पती शंकर पाराजी दुर्गे, सासू चंद्रकला दुर्गे व कांचन संजय गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार , पती शंकर दुर्गे याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्याचा "व्हिडीओ' त्याने मोबाईलमध्ये "रेकॉर्ड' केला होता. हा "व्हिडीओ' पाहिल्याच्या रागातून पती शंकर याने पत्नी स्वातीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले.

सासू चंद्रकला दुर्गे व कांचन संजय गायकवाड यांनी शिवीगाळ करीत स्वातीला लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली.
थोडे नवीन जरा जुने