भारत स्काऊट्‌स आणि गाईड्स संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय - क्रीडामंत्री सुनिल केदार

भारत स्काऊट्‌स आणि गाईड्स संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय - क्रीडामंत्री सुनिल केदारमुंबई : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्‌स आणि गाईड्‌स संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात विभागाकडून सविस्तर अहवाल मागविण्यात येणार असून त्यावर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.

मंत्रालयात स्काऊट्‌स आणि गाईड्‌स संस्थेच्या विविध मागण्या व समस्यांसंदर्भात आयोजित बैठकीत श्री.केदार बोलत होते. यावेळी क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरीया उपस्थित होते.

श्री. केदार म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन, रजा रोखीकरण यासह इतर मागण्यासंदर्भात सविस्तर अहवाल मागविण्यात येणार आहे. वित्त विभागासह विभागाचा यावर अभिप्राय मागविण्यात येणार आहे. त्यानंतर सकारात्मक निर्णय घेऊन त्यांच्या समस्या मार्गी लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.शिक्षण पद्धतीचा एक घटक म्हणून भारत स्काऊट्‌स आणि गाईड्‌स चळवळ ही राज्य सरकार यांना जोडणारा एक जबाबदार दुवा म्हणून काम करते.

मुला-मुलींमध्ये उत्तम चारित्र्याचा विकास करणे, त्यांच्या शारीरिक, मानसिक, नैतिक व अध्यात्मिक शक्तीचा उपयोग व्हावा यासाठी कायद्याने वागणारे चांगले नागरिक निर्माण करणे, चारित्र्यवान, सेवाभावी, स्वावलंबी, नम्र व विनयशील राष्ट्रप्रेमी चांगले नागरिक घडविण्याचे कार्य करणे हा या योजनेचा उद्देश असल्याचे श्री. केदार यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार भाई नगराळे, सुधाकर कोल्हे, ज्ञानोबा मुंडे, आर.डी.वाघ, शोभना जाधव उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने