स्वतः चा व्यवसाय सुरु करायचाय ? मग हे करा

मंडळी , मूर्ख माणूस कोण . . ? याच्या अनेक व्याख्या सांगता येतात. त्यात आणखी एक भर म्हणजे, मूर्ख तोच , जो दररोज तेच ते काम करत राहतो आणि तरीही त्याला असं वाटतं की, आपण रोज काहीतरी नवीन काम करत आहोत. 


म्हणजे , तो भलत्याच झाडाच्या बिया पेरतो आणि त्याची अपेक्षा असते ती म्हणजे , त्या झाडाला आंबा लागला पाहिजे. असं कसं होईल . . ? हेच उदाहरण नोकरी किंवा व्यवसायाच्या बाबतीत द्यायचं तर, फक्त हातात लॅपटॉप घेऊन आणि सूट घालून कुणी व्यवसाय करू शकत नाही. 

कारण , जर ग्राहक कोण आणि ग्राहकांची गरज काय, हेच माहिती नसेल तर व्यवसाय करताच येणार नाही . आणि जर ही गरज समजली तर मग , कुठल्याच प्रेझेंटेशनची गरज पडत नाही. यशस्वी उद्योगपतींची घराणी यासाठी पाहावीत. 

त्यांचे व्यवसाय कोणत्या परिस्थितीत सुरू झाले ? त्यांनी औपचारिक शिक्षण घेतलेलं होतंच, असं नाही. तरीही ते यशस्वी आहेत. जर ख-या उद्योजकाला कधी भेटण्याची वेळ आलीच, तर एक गोष्ट नक्की लक्षात येते, ती म्हणजे , ते उद्योजक हे नेहमीच मूलभूत गोष्टींवर अधिक बोलतात. अगदी मूलभूत प्रश्न विचारतात.
थोडे नवीन जरा जुने