आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन


मुंबई : शेतकरी डोळे लावून बसलेल्या महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ सोमवार, २४ पासून मिळण्यास प्रारंभ होत आहे. पहिल्या टप्प्यात राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांची निवड केली असून सुमारे २० हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात उद्यापासून पैसे जमा होतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केली.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. महिलांवरील अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनात ५ मार्च रोजी महिलांच्या समस्यांवर एक दिवस चर्चा होणार असून ६ मार्च रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला परंपरेप्रमाणे विरोधकांसाठी सायंकाळी सह्याद्री राज्य अतिथिगृहावर महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने चहापान आयोजित करण्यात आले होते. त्यावर विरोधकांनी बहिष्कार घातला.

दरम्यान, मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होईल. दुसरी यादी २८ फेब्रुवारी रोजी जाहीर होईल. तीन महिन्यांत या योजनेची प्रक्रिया पूर्ण होईल.
थोडे नवीन जरा जुने