छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ही प्रतिज्ञा करा


मी प्रतिदिन कुलदेवतेचा नामजप करीन आणि ‘माझे राष्ट्र आदर्श व्हावे’, अशी प्रार्थना करीन. रामायण, महाभारत यांमधील गोष्टी वाचीन. प्रतिदिन आईला नमस्कार करीन. छ. शिवाजी महाराजांना आदर्श म्हणून पाहीन. 

दूरदर्शनवरील राष्ट्रप्रेम जागृत करणार्‍या मालिका, उदा. छ. शिवाजी महाराज, झाशीची राणी इत्यादी पाहीन आणि ‘राष्ट्र माझे कुटुंब आहे’, असा विचार करीन. मित्रांना वाढदिवसाची भेट म्हणून शिवरायांचे चित्र देईन. शिवरायांच्या बालपणीच्या शौर्यकथा वाचीन. स्वसंरक्षणासाठी कराटे किंवा लाठीकाठी यांचे प्रशिक्षण घेईन.
थोडे नवीन जरा जुने