किती वेळा ब्रश करावा?दातांशी संबधित वैद्यकीय समस्यांची अनेक उदाहरणे आपण पाहतो, दातांना होणारी वेदना कमी व्हावी, या उद्देशाने विशिष्ट पद्धतीने ब्रश करण्याचाही सल्ला दिला जातो. दर १० पैकी किमान ३ रुग्ण त्यांच्या दातांच्या संवेदना आणि हिरडय़ांमधून रक्तस्त्रावाच्या समस्या घेऊन येतात. दात घासताना किंवा ब्रश करताना मोठय़ा प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो.

अनेकदा त्यांना वाटते की, ब्रशिंगचे हे काम सोपे कसे होईल? काहीजण ब्रशिंगच्या बाबतीत ब-याच गोष्टी गृहित धरतात, त्यामुळे याबाबत अधिक काळजी घेतली पाहिजे. दररोज सकाळी ब्रश करताना किंवा दात घासताना योग्य प्रकारे घासण्याची प्रक्रिया केली पाहिजे. म्हणूनच त्यासाठी खालील बाबींचा विचार केला पाहिजे व त्या गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत.

तुम्हाला जेवढे आवश्यक वाटते, त्याहून अधिक वेळ दात घासा पण त्याची झिंग चढू देऊ नका.

अनेकजण आपले दात अक्षरश: रगडतात, त्यामुळे संवेदनशील हिरडय़ांना त्रास होतो. बरीच मंडळी हा प्रकार योग्य असल्याचे मुलांवर बिंबवितात. वास्तविक हा प्रकार सोपा व जलद असल्याचे अनेकांना वाटते, पण तसे नाही. तुम्ही फक्त दोन मिनिटे योग्यरित्या ब्रश करू शकता, तेवढे पुरेसे आहे.


ब्रशिंगचा जोर किंवा ताकद

ब्रश करताना हे विचारात घ्या की, प्रत्येकवेळी आपण दात घासताना जो दाब देतो, त्यामुळेही त्रास होऊ शकतो. स्वत:च्या टूथ ब्रशवर जोर देताना त्याचे नुकसानही होते. म्हणूनच ब्रश हे तीन महिन्यांच्या फरकाने बदलले पाहिजे. ब्रश हे लवचिक मानेचे असावेत, तसेच त्याची पकड योग्यप्रकारे घेता येईल, या दृष्टीने ही त्याची रचना असावी. अशा ब्रशच्या सहाय्याने हळूवारपणे दात घासावेत. तसेच ही पकड मजबूत असल्यामुळे दातदेखील व्यवस्थितपणे स्वच्छ होतात.

पद्धतशीरपणे काम करा

काही जण समोरच्या दातांवर अधिक वेळ ब्रश करतात, तर उजव्या हाताचे लोक उजव्या दिशेने किंवा डाव्या हाताचे लोक डाव्या बाजूने तुलनात्मक दृष्टीने कमी प्रमाणावर दात घासतात. त्यामुळे शेवटच्या टोकांपर्यंत ब्रश नीट होणे अवघड होते. दुस-या बाजूने दात अधिक रगडले गेल्यामुळे हिरडय़ांची संवेदना वाढते आणि त्यांना त्रास होऊ लागला की, डोळ्यातून पाणी येण्यासारखी परिस्थिती होते. वेदना वाढतात. म्हणूनच योग्य पद्धतीने दात घासले गेले पाहिजेत. आपल्या ब्रशला ४५ अंश कोनात ठेवून दात व हिरडय़ांना मसाज दिला पाहिजे. त्याचबरोबर वर्तुळाकार आकारात जबडय़ांच्या वरचा, खालचा, समोरच्या व आतील बाजूने पद्धतशीरपणे ब्रश फिरवले पाहिजे. यालाच मॉडिफाईड बास टेक्निक पद्धतीचा अवलंब असे म्हणता येईल.

टूथ ब्रश विषयी टीप्स

दात सरळ आणि एकसमान नसतील, तर अनेकजण ठराविक उंचीचे ब्रिसल्स वापरतात. त्यामुळे दातांना स्वच्छ ठेवणे, तसेच वर्तुळाकार पद्धतीने ते घासण्यासाठी मदत होऊ शकते. त्याचबरोबर दात व हिरडय़ा तसेच त्यांच्या मधला भाग देखील स्वच्छ ठेवता येतो. दात घासण्याचा ब्रश हा दर तीन महिन्यांनी बदलला पाहिजे. नरम आकाराचे ब्रिसल्स हे दात व हिरडय़ांसाठी उपयुक्त आहेत. स्प्ले ब्रिसल्स वापरू नयेत, त्यामुळे तोंडावाटे जीवाणू जाण्याची प्रक्रिया प्रत्येक वेळी ब्रश करताना होऊ शकते.

ब्रशबरोबरच इतर सहाय्यक बाबी

दातांमध्ये अडकलेले अन्नकण दूर करण्यासाठी दात स्वच्छ घासले पाहिजेतच. पण, अनेकदा ते अन्नकण निघत नाहीत. अशावेळी फ्लॉसिंग किंवा प्लक अथवा फायबरच्या धाग्यांचा वापर केला जातो. अ‍ॅडल्ट डेंटल हेल्थ सव्‍‌र्हेच्या अभ्यासानुसार अफ्लॉसिंगच्या सहाय्याने दात स्वच्छ करण्याचे प्रमाण हे ३ व्यक्तींमध्ये एक असे आहे. याशिवाय दात स्वच्छ करण्याचा आणखी एक उपाय म्हणजे वॉटरपिक या वॉटर जेट डिव्हाईसचा वापर करणे. (दंतवैद्यांकडे ही सामग्री असते), वॉटर फ्लॉसर्सचा उपयोग करणे असेही आहेत. त्यामुळे फ्लॉसिंगचा उपयोग ज्या भागात होऊ शकत नाही, तिथे दातांची स्वच्छता करणे सोपे होते. लाकडाच्या काडीने दात साफ करणे टाळा. त्यामुळे दातांमधील पोकळीत वाढ होऊ शकते. त्याचा नंतर त्रास देखील होतो. टूथ पिक हिरडय़ांना देखील नुकसान पोहोचवू शकते. त्यातून भविष्यात हिरडय़ांशी संबंधित व्याधी किंवा रोग होण्याची शक्यता असते.
इलेक्ट्रिक विरुद्ध हाताने ब्रश

इलेक्ट्रिक पद्धतीने ब्रशने दात साफ करण्यापेक्षा हाताने ब्रश करणे कधीही चागंले. जर आपल्याला कमी प्रमाणात दाब देऊन आणि किती वेळ दात घासायचे याचे तंत्र आत्मसात करता आले, तर नक्कीच हे कधीही चांगले.

वयस्कर किंवा दिव्यांग व्यक्ती पॉवर ब्रशचा उपयोग करतात, पण त्यांना हिरडय़ांमधील संवेदना थोडय़ा अधिक प्रमाणावर दातांवर दाब पडत असल्यामुळे जाणवतात. अनकेदा त्यामुळे काही प्रमाणावर दुखापत देखील होते. पॉवर ब्रशची एक कमतरता अशी आहे की, त्यामुळे खूप वेळ जातो. डोके आणि दात यांची वारंवार हालचाल करावी लागते. याउलट हाताने ब्रश करताना ३-४ मिनिटांचाच वेळ लागतो.

अन्य काही महत्त्वाच्या बाबी

जर तुम्हाला वारंवार दुखणे किंवा संवेदनशीलपणाचा अनुभव येत असेल, तर त्या तंत्राचा अवलंब न करता, दंत वैद्यांनी सुचविलेल्या मार्गाचा अवलंब करा. तसेच त्यांच्याशी या विषयावर चर्चा करून सल्ला घ्या आणि आपले तंत्र सुधारा.

जर कुठल्याही प्रकारची मौखिक शस्त्रक्रिया अथवा उपचार सुरू असेल, तर दात साफ करण्याच्या तंत्रात दंतवैद्याच्या सल्ल्याने बदल करा.

किती वेळा ब्रश करावा?

जुन्या शिकवणीनुसार जेवणानंतर ब्रश करावा. पण, अनेकदा ही बाब प्रत्यक्षात शक्य होत नाही. प्रत्येकालाच दरवेळी ब्रश करता येईल, अशी परिस्थिती नसते. आणि ती तितकी फायदेशीर देखील नाही.

त्या ऐवजी दिवसातून किमान दोन वेळा दोन मिनिटे तरी ब्रश करा. जर तुम्ही दिवसातून तीन वेळा ब्रश करणार असाल, तर ध्यानात ठेवा की काही खाल्ले किंवा प्यायले तर किमान एक तासाचे अंतर ठेवा आणि मगच ब्रश करा. तोपयर्ंत हिरडय़ा सामान्य अवस्थेत आलेल्या असतील. ज्यावेळी आपण काही खातो, त्यावेळी तोंडातील आम्लाची पातळी ही वाढलेली असते. ४० मिनिटांनंतर ती पूर्ववत होते. त्यामुळे हिरडय़ादेखील सामान्य अवस्थेत येतात. अशावेळी ब्रश करणे कधीही चांगले.

च्युईंगम हे देखील आम्लाचे उदासिनीकरण करण्यास सहकार्य करते. ब्रश करण्याच्या प्रक्रियेसारखे ते परिणाम देते. मात्र २० मिनिटे किंवा त्याहून अधिक काळ च्युईंगम चघळला तर मात्र जबडय़ांना त्रास होतो. त्यातील स्नायू दुखू लागतात.
थोडे नवीन जरा जुने