मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती देण्यास नकार पण..नवी दिल्ली : मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला मोठा दिलासा  दिला आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा अंतरिम आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. 

मात्र मराठा आरक्षणासंदर्भातील कागदपत्रांचे वेळेत भाषांतर करा, अशी सक्त ताकीदही सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिली आहे.

मराठा आरक्षण संदर्भात कागदपत्रांचं वेळेत भाषांतर करण्याची सूचना सुप्रीम कोर्टाने केली आहे. या प्रकरणी अंतिम सुनावणीला सुप्रीम कोर्टात 17 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यानंतर पुन्हा सवलत दिली जाणार नाही, असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे.
थोडे नवीन जरा जुने