मुलीला हैदराबादला पळवून नेऊन अत्याचारपरतूर : शहरातील आठवीत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलीला हैदराबाद येथे पळवून नेऊन अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

 पोलिसांनी आरोपीला हैदराबाद येथून अटक केली असून जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला १७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. नसीर काजी असे आरोपीचे नाव आहे.

३१ जानेवारीला या आरोपीने पीडितेला फूस लावून हैदराबादला पळवून नेले होते. तिच्या कुटुंबियांनी नसीर याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. १५ दिवसांंपूर्वीही या मुलीचा विनयभंग केला होता. मात्र बदनामीच्या भीतीने कुटुंबीयांनी पोलिसांत जाणे टाळले होते.

मुलीच्या कुटुंबीयांनी नसीरला समोर बोलावून समज दिली होती. मात्र, नंतरच्या काळात आरोपीने मुलीचा माग काढणे सुरूच ठेवले होते.
थोडे नवीन जरा जुने