घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट सारखी Chicken Biryani




Chicken Biryani – चिकन बिरयानी एक प्राचीन भारतीय डिश आहे जीला विविध समारंभात नक्की समाविष्ट केल्या जाते. तसं पाहता घरी नेहमीच वेगवेगळया निमीत्तानी चिकन बिरयानी बनवली जाते. बहुतेकदा रात्रीच्या जेवणात चिकन बिरयानीचा समावेश केला जातो. चिकन बिरयानी बनविण्याची एक मोठी प्रक्रिया आहे पण जर तुम्ही बनविण्याआधी ही प्रक्रिया व्यवस्थित समजुन घेतली तर अगदी सहज तुम्ही याला घरी बनवु शकाल.
चिकन बिरयानीसाठी लागणारी सामग्री:

1 कप तेल / तुप

एक मोठे चिकन ( साधारण 1200 ग्रॅम ) छोटया तुकडयांमधे

750 ग्रॅम बासमती तांदुळ, अध्र्या तासापर्यंत पाण्यात भिजवलेले

1 ते 2 तेजपान

4 कांदे कापुन ठेवलेले

2 कप दही

2 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या

2 चमचे आलं लसणाची पेस्ट

5 ते 6 छोटे टोमॅटो बारीक कापलेले

4 लवंगा

2 इंच दालचीनी ची काडी

4 इलायची

अर्धा चमचा शाही जीरे

2 चमचे लाल तिखट पावडर

पुदीना

2 चमचे धणे पावडर

चवीनुसार मीठ

कोथींबीरीची जुडी

चिकन बिरयानी बनविण्याचा विधी:

एका मोठया भांडयात तेल किंवा तुप गरम करा आणि त्यात तेजपान, लवंग, दालचीनी, इलायची, शाही जीरे आणि लाल तिखट टाकुन 25 ते 30 सेकंद तळुन घ्या.

आता कांदा टाकुन सोनेरी रंग येईपर्यंत तळुन घ्या.

यानंतर त्यात आलं लसणाची पेस्ट टाकुन 30 सेकंद पर्यंत मिश्रण हलवा नंतर लाल तिखट, धणे पावडर, मीठ, टोमॅटो, चिकन आणि दही टाका आता चिकन शिजेपर्यंत तेल भांडयाच्या किना-यावर येईपर्यंत शिजवुन घ्या.

आता त्यात लिंबाचा रस, कोथींबीर आणि पुदीना टाका यानंतर गॅस बंद करून भांडयाला बाजुला ठेवा आता आपण पुलाव बनवुन घेउ.

एका मोठया भांडयात पुलाव शिजवण्याकरता पुरेसे पाणी घेउन गरम करून घ्या नंतर त्यात तांदुळ मीठ आणि 1 चमचा तेल टाकुन दया तेल तांदळाच्या दाण्याला वेगवेगळे ठेवण्यास सहाय्यक ठरतं तुम्ही तांदुळ शेवटी देखील टाकु शकता.

आता जवळजवळ 70% तांदुळ शिजवुन घ्या ( ही स्टेप खुप आवश्यक आहे अशावेळी एक मिनीटाकरता देखील स्वयंपाकघर सोडुन जाउ नका )

एका भांडयात पुलाव टाका त्याला मिक्स करू नका मिक्स करण्यापुर्वी 1 चमचा तुप पुलाववर टाका.

आता त्याला झाकुन ठेवा वाफ बाहेर येणार नाही याची काळजी घ्या.

आता मंद आचेवर कमीत कमी 20 मनीटे गे्रवीला गरम करून घ्या.

आता सर्व्ह करण्यापुर्वी ग्रेवी आणि पुलावला मिक्स करून घ्या आणि शेवटी गरमागरम बिर्यानीला रायत्यासोबत सर्व्ह करा.

तर अश्याप्रकारे तयार आहे तुमची गरमागरम चिकनबिर्यानी तुम्ही तुमच्या हाताने घरी बनवा आणि सगळयांना पोटभर खाउ घाला मग बघा सगळे कसे तुमचे कौतुक करतात ते!

चिकनबिर्यानी बनवतांना काही खास गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्या अश्या

बिर्यानी बनवतांना तांदुळ जास्त ओले आणि जास्त शिजवलेले नसावेत तांदुळ मउ असतील तर बिर्यानी चांगली बनेल.

बिर्यानी बनवतांना चांगले तांदुळच वापरा.

तांदुळ चांगले शिजवण्याकरता एका भांडयात पाणी गरम करा आणि त्यात तांदुळ टाका. जेव्हां पाणी उकळायला लागेल तेव्हां तांदुळ 10 च मिनीटे शिजवा बाकी सगळे तांदुळाच्या गुणवत्तेवर अवलंबुन आहे. आता तुम्ही तांदुळाला दाबुन पाहिल्यास तो तुम्हाला पुर्ण झालेला किंवा कच्चा लागायला नको तो मध्यावस्थेत असायला हवा.
थोडे नवीन जरा जुने