व्हॅलेंटाइन डे’ला टवाळकी करणे पडले महागात !

हिंगोली :- औंढा नागनाथ येथे शाळा, महाविद्यालयासह बसस्थानक परिसरात शुक्रवारी व्हॅलेंटाइन डेनिमित्त होकाराच्या प्रतीक्षेत उभ्या रोडरोमिओना पाेलिसांच्या चिडीमार पथकाच्या काठ्यांचा ‘प्रसाद’ खावा लागला. 


चौदा जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. व्हॅलेंटाईन डे मुळे मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढण्याची शक्यता होती. 

त्यामुळे पोलिस अधीक्षक योगेशकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक जगदीश भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा, महाविद्यालय तसेच बसस्थानक परिसरात चिडीमार पथके तैनात करण्यात आली होती. या शिवाय साध्या वेशातील पोलिस कर्मचारी देखील तैनात केले होते. 
थोडे नवीन जरा जुने