कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी पिता-पुत्रांची विहिरीत उडी मारून आत्महत्या !

नांदेड : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी पिता-पुत्रांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मौजे वागदरवाडी, ता. लोहा येथे १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. 


केरबा पांडुरंग केंद्रे (४५) व शंकर केरबा केंद्रे (१७) असे मृत पिता-पुत्राचे नाव आहे. केरबा केंद्रे यांचे सहा जणांचे कुटुंब असून त्याचा उदरनिर्वाह पाच एकर कोरडवाहू शेतीवर चालत होता. 

आर्थिक गर्तेत अडकल्याने केंद्रे कुटुंबाने बँकेकडून व सावकाराकडून कर्ज घेतले होते. आर्थिक विवंचना वाढत गेल्याने काही दिवसांपूर्वी त्यांनी गृहकर्जसुद्धा घेतले होते. 

या वर्षी झालेल्या अतिवृष्टीने या शेतकऱ्यांचे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे व कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवायचा या चिंतेत शेतकरी पिता-पुत्रांनी १४ फेब्रुवारी रोजी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
थोडे नवीन जरा जुने