असे करा Meditation

Meditation योगा मधील एक भाग आहे.योगा मध्ये श्र्वासाला महत्वाचे स्थान आहे. श्र्वासामुळे आपले वय वाढते व कमी होते,श्र्वासावर नियंत्रण मिळवल्यामुळे सर्व अवयवांना नियंत्रित करता येते.

 श्र्वास या क्रियेमुळे आपले ध्यान केद्रित आणि सक्रीय करण्यास मदत मिळते.ध्यान करता वेळी जेंव्हा आपले मन अस्थिर होते तेंव्हा श्र्वासन क्रियेवर ध्यान केंद्रित केल्यामुळे हळूहळू मन स्थिर होते. यामुळे आपले ध्यान केंद्रित होते.ध्यान करता वेळी मोठा श्र्वास घेऊन हळूहळू सोडण्याने शारीरिक आणि मानसिक लाभ मिळतो. डोळे बंद करून आतील बुबुळ स्थिर करा, जीभ अजिबात हलऊ नका, एकदम स्थिर ठेवा, जर आपल्याला कोणताही विचार आला तर तो विचार सोडून आणि ध्यानस्त व्हा. हे जबरदस्ती करू नका, आपले लक्ष केंद्रित करा,बाहेरील आवाजाकडे दुर्लक्ष करा व ओम च्या आवाजावर ध्यान केंद्रित करा.

याच प्रकारे शरीरात पण एक आवाज येत असतो तो ऐकण्याचा प्रयत्न करा तसेच डोळ्यांच्या समोरील पसरलेल्या काळोखाला बघण्याचा प्रयत्न करा.Meditation करण्याच्या आधी एखादी शांत जागा शोधा, प्रकृती आणि हिरवीगार झाडांची कल्पना करा आपण एखाद्या टेकडीवर बसलो आहोत आणि थंडगार हवा सुटली आहे अशी कल्पना करा, आपले इष्टदेव आपल्या समोर आहेत अशी कल्पना करा, आपले ध्यान सुरवातीला भटकू नये यासाठी आपण कल्पना करतो.

Meditation करता वेळी एखादी शांत जागा शोधा आपल्या मनात कोणतेही विचार येऊन देऊ नका, आपले शरीर सैल सोडा, आणि शरीरात कंपन होऊ दे आणि त्याचा अनुभव करा कि हि उर्जा आपल्या पायातून वर वाहत आहे हि प्रक्रिया २० मिनिटांपर्यंत करा यामुळे आपले ध्यान बाहेरच्या गोष्टी सोडून फक्त एका गोष्टीवर केंद्रित होईल.
थोडे नवीन जरा जुने