RBI ला दुसरा धक्का, डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा


मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आरबीआयच्या एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पद सोडले आहे. यापूर्वी आरबीआय गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी डिसेंबरमध्ये  राजीनामा दिला होता.

विशेष म्हणजे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याच्या सहा महिन्यांआधीच पदाचा राजीनामा दिला आहे. आचार्य यांनी तीन वर्षांसाठी आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून 23 जानेवारी 2017 रोजी जॉइन केले होते.
थोडे नवीन जरा जुने