पोलिस दलाच्या लौकिकाला धक्का, गैरवापराची चौकशी व्हावी : शरद पवार


मुंबई : कोरेगाव भीमा व एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे दिला, तो केंद्राचा अधिकार आहे. परंतु कोरेगाव भीमा किंवा एल्गारची चौकशी व्हावी ही आमची मागणी नाही. पोलिस दलाचा ज्या पद्धतीने गैरवापर झाला, त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. 

ते म्हणाले, पुणे पोलिसांनी जो तपास केला, त्यामुळे पोलिसांच्या लौकिकाला धक्का बसला. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस आणि पुणे पोलिसांची चौकशी व्हावी.

एल्गार प्रकरण व कोरेगाव भीमा दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. कोरेगाव भीमाचा प्रकरणाचा तपास केंद्राकडे देणार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. ते म्हणाले, कोरेगाव भीमा प्रकरण दलित समुदायाशी संबंधित आहे. त्याचा तपास केंद्राकडे सोपवणार नाही. 

विशेष म्हणजे राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच एल्गार परिषद प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नाणार प्रकल्पाबाबतची भूमिकाही स्पष्ट केली. ‘सामना’त जाहिरात आली म्हणजे शिवसेनेची भूमिका बदलली अस समजू नका. नाणार प्रकल्पाला आमचा विरोध आहे आणि तो कायम राहणार, हा प्रकल्प मी सुरू होऊ देणार नाही. शिवसेनेची भूमिका मी ठरवतो जाहिरातदार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
थोडे नवीन जरा जुने