माणुसकीला काळिमा: बलात्कार करून ४ वर्षे त्रास, बदनामीमुळे गराेदर महिलेची आत्महत्या !

हिंगोली :- जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. दाेघे तिच्यावर बलात्कार करत हाेते, तर तिसरा त्याचे माेबाइलवर चित्रीकरण करत हाेता. या घटनेनंतर गावात बदनामी करण्याची धमकी देत त्यांच्यातीलच एकासाेबत अनैतिक संबंध ठेवण्यास मजबूर करत होते. 


अखेर चार वर्षे बदनामी सहन केल्यानंतर साखरा येथील त्या महिलेने गुरुवारी (दि. १३ ) गळफास घेऊन अात्महत्या केली. या घटनेचा खुलासा विवाहितेने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतूनच झाला असून खळबळजनक बाब म्हणजे हा अत्याचार झाला तेव्हा ती दाेन महिन्यांची गराेदर हाेती. 

दरम्यान, मृत विवाहितेच्या नातलगांनी आराेपींवर गुन्हा दाखल हाेईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पावित्रा घेतल्यानंतर शुक्रवारी पहाटे तिघांवर बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नाेंदवण्यात अाला अाहे. तिघेही नराधम फरार असून सेनगाव पाेलिस त्यांचा शाेध घेत आहेत.
थोडे नवीन जरा जुने