परमोच्च आनंद देणार्‍या प्रणयाचे 15 खास फायदे
प्रणय (सेक्स) हा एक असा टॉपिक आहे, ज्याच्याशी प्रत्येकजण आपोआप जुळला जातो आणि बहुतांश लोक या विषयावर चर्चा करण्यास नकार देतात. सेक्सविषयी आजही समाजात अनेक गैरसमज आहे.
परंतु वास्तवामध्ये प्रणय सर्वांसाठी फायदेशीर आहे. प्रणयाचा शरीरावर खूप प्रभाव पडतो. पुढे जाणून घ्या, प्रणयाच्या परमोच्च आनंदाचे कोणकोणते खास फायदे आहेत.

पिट्सबर्ग युनिवर्सिटी आणि नॉर्थ कॅरोलाइना यूनिवर्सिटीच्या शोधानुसार प्रणयामुळे ऑक्सिटॉसिन हार्मोन्सचा स्तर वाढतो. या हार्मोनमुळे आपसातील संबंध मजबूत होतात आणि विश्वास वाढतो. या हार्मोनच्या या गुणामुळे याला लव्ह हार्मोन असेही म्हटले जाते. ऑक्सिटॉसिन हार्मोन्समुळे कपल्समध्ये एकमेकांबद्दल उदारतेची भावना वाढते.


स्कॉटलंडमधील शोधानुसार प्रणयाचा आरोग्याला सर्वात मोठा फायदा आहे. यामुळे ब्लडप्रेशर नॉर्मल राहते आणि तणाव कमी होतो. 24 महिला आणि 22 पुरुषांवर केलेल्या एका अभ्यासात आढळून आले की, जे लोक नियमित प्रणय करतात ते तणावाला सहजरीत्या दूर करण्यास सक्षम ठरतात. आणखी एका परीक्षणानुसार प्रणय करत राहिल्याने ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.


एक जुना भ्रम असा आहे की, प्रणय केल्याने जास्त वयाच्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त राहते. परंतु इंग्लंडमधील एका रिसर्चनुसार हा केवळ एक भ्रमच असून यामध्ये कोणतेही तथ्य नाही. एपिडिमियॉलजी अँड कम्यूनिटी हेल्थ जर्नलमध्ये छापून आलेल्या रिपोर्टनुसार 914 पुरुषांमध्ये केल्या गेलेल्या परीक्षणावरून प्राणायादरम्यान त्यांना आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याचा प्रणयाशी काहीही संबंध नाही.


पुरुषांसाठी एक उत्तम प्रणय 'डायझापाम'सारख्या औषधाचे दोन-तीन डोस घेण्याएवढाच दमदार आहे. डायझापाम औषधामुळे मांसपेशीतील तणाव कमी होतो. प्रणयामुळे महिलांना भावनिक फायदा होतो आणि त्या डिप्रेशनसारख्या आजारापासून दूर राहतात. महिलांना परमोच्च आनंदाची जाणीव पुरुषांच्या तुलनेत जास्त वेळ राहते कारण सर्विक्स स्पर्म ओव्हरीपर्यंत जाण्याच्या प्रक्रीमध्ये वेळ लागतो. या दरम्यान महिला परमोच्च आनंदाचा अनुभव घेतात.
स्मोकिंग आणि डायबिटीजप्रमाणे, जर पुरुषांच्या सेक्स ऑर्गनमध्ये नियमित ब्लड फ्लो झाला नाही तर विविध पेशी नष्ट होतात. एका रिसर्चनुसार जे पुरुष आठवड्यात एका वेळेपेक्षा कमी प्रणय करतात, त्यांना इरेक्टाइल डाइफंक्शन (नपुंसकता) येण्याची शक्यता दुपटीने वाढते.


तुम्हाला स्मोकिंग सोडण्याची इच्छा आहे? तर मग प्रणय करा. लक्षात ठेवा, स्मोकिंगमुळे पुरुषाचे सेक्स ऑर्गन कमकुवत होण्याची शक्यता जास्त राहते आणि तो नपुंसकसुद्धा होऊ शकतो. ही गोष्ट तुमच्या पार्टनरला अवश्य सांगा, यामुळे तो सेक्समध्ये रस घेईल आणि तसेच त्याचे स्मोकिंगचे व्यसन सुटेल.


अनेकांचा असा समज आहे की, पुरुषांच्या सेक्स ऑर्गनमुळे फर्टिलिटीवर जास्त प्रभाव पडतो, परंतु असे काहीही नाही. तुम्ही किती वेळा प्रणय करता, या गोष्टीवरून फरक पडतो. तुम्ही जेवढा जास्त प्रणय करता तेवढाच जास्त फायदा तुमच्या आरोग्याला होतो.


प्रणय केल्याने मसल्स मजबूत होतात आणि हाडांची मजबुती वाढते. ज्या महिला कमी सेक्स करतात, त्यांना रजोनिवृत्तीनंतर ऑस्टियोपोरोसिसची समस्या होऊ शकते. नियमित प्रणयाने ऑस्ट्रोजन हार्मोनचा स्त्राव जास्त होतो, जो फायदेशीर आहे.


प्रणयाच्या माध्यमातून तुम्ही तुमचे डोळे तपासू शकता. प्रणयामुळे डोळ्यांचे मसल्स ठीक होतात आणि मानेच्या वेदानाची कमी होण्यास मदत होते. टेन्शन दूर करण्यासाठी आणि मांसपेशींना आराम देण्यासाठी प्रणय हा एक उत्तम योगा टाइप व्यायाम आहे. लक्षात ठेवा, प्रणयानंतर तुमच्या डोळ्यांना अंधुक व्हिजन दिसले तर डॉक्टरांना डोळे दाखवा.
दर्जेदार सेक्स हेल्थचा थेट प्रभाव फिजिकल हेल्थवर पडतो. विल्किस यूनिवर्सिटीच्या शोधानुसार आठवड्यातून एक-दोन वेळेस प्रणय केल्याने इम्यूनोग्लॉबिन नावाच्या अँटीबॉडीमध्ये वाढ होते. 112 विद्यार्थ्यांवर केल्या गेलेल्या रिसर्चवरून आढळून आले आहे की, या अँटीबॉडीमुळे सर्दीसारख्या इन्फेक्शनला रोखण्यास मदत मिळते.


प्रणयामुळे लठ्ठपणा कमी होण्यासाठीसुद्धा मदत होते. अर्ध्या तासाच्या प्रणयामुळे 85 कॅलरी बर्न होतात. 85 कॅलरी हे प्रमाण फार जात नाहीये, परंतु विचार करा अर्ध्या तासाच्या 42 सेशननंतर 3570 कॅलरीज बर्न होतील. एवढ्या कॅलरीज बर्न झाल्यानंतर एक पाउंड वजन कमी होईल.


एकदा ऑक्सिटॉसिन हार्मोनचा स्तर कमी होण्यास सुरुवात झाली तर एंड्रोफिन हार्मोनचा स्तर वाढतो, ज्यामुळे वेदना कमी होतात. यामुळे जे सेक्सनंतर तुमच्या डोकेदुखी किंवा सांधेदुखीच्या वेदना कमी झाल्या तर चकित होऊ नका. हे सर्वकाही सेक्समुळे घडते.


एका यूरोलॉजी इंटरनॅशनलच्या ब्रिटिश जर्नलमध्ये छापून आलेल्या रिपोर्टनुसार सेक्समुळे पुरुषांमधील प्रॉस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो. रिपोर्टनुसार जे लोक वयाने 30 वर्षांपेक्षा कमी आहेत, सेक्समुळे त्यांना भविष्यात प्रॉस्टेट कॅन्सरचा धोका कमी राहतो. 30 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना नियमित सेक्स केल्याने प्रॉस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो.


एका रिसर्चनुसार सेक्समुळे शांत झोप लागते. सेक्सनंतर रिलीज झालेल्या ऑक्सिटॉसिनचा एक फायदा हासुद्धा आहे. शांत झोपेमुळे इतर व्याधीसुद्धा नष्ट होतात. झोप पूर्ण झाल्यामुळे वजन आणि ब्लडप्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
थोडे नवीन जरा जुने