चुकूनही 'हे' 5 पदार्थ खाऊच नका नाहीतर
काही पदार्थ अणि पेय तुम्ही दररोज दीर्घ काळापर्यंत घेत असाल तर त्याचे विपरीत परिणाम त्वचा आणि दातांवर पडणे स्वाभाविक आहे
काही पदार्थ अणि पेय तुम्ही दररोज दीर्घ काळापर्यंत घेत असाल तर त्याचे विपरीत परिणाम त्वचा आणि दातांवर पडणे स्वाभाविक आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.


१. कॅफीन :

कॅफीनमुळे जास्त लघवी होते. शरीराला पाणी देखील कमी मिळते. परिणामी आपली त्वचा तजेलदार दिसत नाही. त्वचा शुष्क आणि कोरडी वाटू लागते. निस्तेज त्वचेमुळे व्यक्ती वयस्क वाटू लागतो.


२.गोड :
जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त शुगर घेतो तेव्हा आपली सेल्स शुगर मॉलिक्यूल्सला प्रोटीनशी मिसळते. यामुळे अडव्हान्स ग्लायकेशन अँड प्रोडक्टसची (एजीईएस) निर्मिती होते. हा घटक त्वचेतील कोलोजन नष्ट करतो. परिणामी त्वचा सैल होते. जास्त साखरेमुळे दातांवर किटाणूंचा हल्ला वाढतो आणि त्याचा रंग पिवळा पडू लागतो.


३.एनर्जी ड्रिक्स आणि ज्यूस :
हे पदार्थ आपल्याला तत्काळ ऊर्जा देतात, परंतु यात अ‍ॅसिसडचे प्रमाण जास्त असते. जास्त ज्यूस पिणे टाळले पाहिजे कारण नैसर्गिक साखर बॅक्टेरिया शोषून घेतात आणि उर्वरित साखरेचे रूपांतर अ‍ॅसिडमध्ये होते. यामुळे दातांची समस्या, दात पडणे असा त्रास होतो.


४.जास्त मीठयुक्त पदार्थ :
सॉल्टीपदार्थ उदा. चिप्स, स्नॅक्स भले आपल्याला स्वादिष्ट वाटत असतील पण याचा त्वचेवर विपरीत परिणाम पडतो. फ्लूड रिटेंशनमुळे त्वचेला सूज येते.


५.लॅमोनेड :
लॅमोनेड अनेकांचे आवडते पेय आहे, परंतु हे दातांसाठी योग्य नाही. यात साखर आणि सायट्रस दोन्ही असतात. हे जास्त प्रमाणात पिल्याने प्लाक तयार होणे सुरू होते. परिणामी दातांवर डाग पडू लागतात आणि दात तुटतात देखील.
थोडे नवीन जरा जुने