'ह्या' 8 सोप्या ट्रिक्स, तुम्ही तुमचे आरोग्य 60 सेकंदात हेल्दी करा
आरोग्य कसे उत्तम ठेवावे हा प्रश्न महिलांच्या डोक्यात सतत येत असतो. आपल्या मनात सकारात्मक आणि नकारात्म दोन्ही विचार येत असतात आणि त्यावर आपले आरोग्य उत्तम राहण्यास मदत होत असते.
त्यामुळे नेहमी सकारात्म गोष्टी मनात आणल्याने तुमचे आरोग्य ठणठणीत राहण्यास मदत होईल.तुमचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी येथे 8 उपाय सांगण्यात येत आहेत. या उपायांचा वापर करून तुम्ही तुमचे आरोग्य 60 सेकंदात हेल्दी करू शकता.
डोळ्यांना आराम द्या...
ऑफिस आणि कॉलेजमध्ये जाणा-या व्यक्ती त्यांचा अधिक वेळ हा कॉम्पुटर वापरण्यात घालवत असतात. त्यांच्या या वापरामुळे स्क्रिनच्या लाइटमुळे आणि खादे वाकवून काम करण्याच्या पद्धतीमुळे डोळ्यांवर तसेच डोक्यावर ताण पडतो. त्यामुळे तुम्ही देखील दिवसातील बराच वेळ कॉम्पुटरवर काम करत असाल तर थोड्या-थोड्या वेळाने डोळ्यांना आराम द्या. डोळ्यांचे डॉक्टर या व्यक्तींसाठी 20-20-20 असा व्यायाम करण्यास सांगतात. यामध्ये दर 20 मिनिटांनंतर 20 सेकंदांसाठी 20 फुटापर्यंतच्या एखाद्या वस्तुकडे बघावे. याशिवाय तुम्ही अधून-मधून तुमच्या खुर्चीवरून उठून दोन्ही हात वर उचलावे आणि स्ट्रेच करावे यामुळे शरिरातील रक्ताभिसरण वाढण्यास मदत होते आणि डोळ्यांना आरामही मिळतो.

8 सोप्या ट्रिक्सबद्दल...

चप्पल-बुट दरवाजाच्या बाहेर काढावे...

तुम्ही बाहेरून जेव्हा-जेव्हा घरात याल त्यावेळी चप्पल-बुट घराच्या बाहेरच काढावे. यामुळे चप्पलेला लागलेली धुळ-माती आणि केमिकल्स यामुळे होणा-या समस्यांपासून तुमचे संरक्षण होईल. तुमच्या या सवयीमुळे तुमचे घर आणि आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.
शिंक आल्यास रूमालाचा वापर करा....

तुम्हाला जर शिंक येत असेल त्यावेळी टिशूपेपर अथवा रूमालाचा वापर करावा.यामुळे तुम्ही वातावरणात असणा-या किटाणूंपासून तुमचे रक्षण होईल आणि तुम्हाला कोणते इन्फेश्नन होणार नाही.


सनस्क्रिन लोशन लावावे..

उन्हापासून त्वचेचे रक्षण व्हावे यासाठी सनस्क्रिन लोशन लावावे.यामुळे तुमच्या त्वचेचे रक्षण तर होईलच तसेच वाढत्या वयात होणा-या प्रभावापासूनही तुमचे रक्षण होण्यास मदत होईल. सनस्क्रिन लावल्याने स्किनचा कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे सर्व ऋतूंमध्ये सनस्क्रिन लावण्याची सवय लावून घ्या.


भरपूर पाणी प्या...

पाणी हे जीवन आहे त्यामुळे भरपूर पाणी प्या. रोज कमीत कमी 8 ग्लास पाणी पिले पाहिजे.आपल्या शरिरात पाण्याचे प्रमाण 70 % आहे. कमी पाणी पिण्याने कोलन पल्स शरिरातील पाण्याचे स्तर अभाधित राहण्यासाठी स्टूलमधून पाणी खेचण्यास सुरूवात करते. यामुळे पोटामध्ये अपचन होण्याची दाट शक्यता असते. भरपूर पाणी पिण्याने तुम्ही अपचन होणे टाळू शकता.

किचन स्पंज 45 सेकंदासाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवावा...

घरामध्ये टॉयलेटमध्येच आजार पसरवणारे कीटाणु असतात असे नाही. तर किचन स्पंजमध्ये असणारे किटाणू देखील तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. किचन स्पंजने तुम्ही ओट्यावर पडलेले अन्न एकत्र करण्याचे काम करत असता. किचन ओटा ओला असल्याने यामध्ये किटाणू तयार होण्यास पोषक वातावरण तयार होते. यासाठी कीटाणूंचा फैलाव रोखण्यासाठी ओला स्पंज रोज 45 सेकंदासाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवावा.

राग आल्यास 20 पर्यंत आकडे म्हणावे...

तुम्हाला जर छोट्या-छोट्या गोष्टींवर राग येत असेल तर तुम्ही अशावेळी 20 पर्यंत आकडे मोजणे सुरू करा. तसेच लांब श्वास घ्या. यामुळे तुमचा राग शांत होईल.थोडे नवीन जरा जुने